Farmer Success Story

Farmer Success Story । शेतकऱ्याचा नादच खुळा! साडे सहा एकर जमिनीतून पपई आणि टरबूज विकून कमावले 42 लाख रुपये; असं केलं नियोजन?

यशोगाथा

Farmer Success Story । शेतकरी आपल्या शेतात वेगेवेगळ्या पिकांची लागवड करून चांगला नफा कमवत आहेत. सध्या देखील लातूरच्या एका शेतकऱ्याची सगळीकडे चर्चा होताना दिसत आहे. या शेतकऱ्याने ६.५ एकर जमिनीतून पपई आणि टरबूज विकून ४२ लाख रुपयांची कमाई केली आहे. यामुळे या शेतकऱ्याचे सगळीकडे कौतुक केले जात आहे. मंगेश शिवराजप्पा धनासुरे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. या शेतकऱ्याचे नशीब पपईच्या शेतीमुळे पालटले.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

मंगेश शिवराजप्पा धनासुरे या शेतकऱ्याने अवघ्या 4 महिन्यात पपईच्या शेतीतून लाखो रुपयांची कमाई केली आहे. शेतकरी मंगेश हे आता इतर शेतकऱ्यांसाठी आदर्श बनले आहेत. अनेक शेतकरी त्यांच्याकडे येऊन मार्गर्दर्शन घेत आहेत. येत्या काही वर्षांत ते पपईचे क्षेत्र वाढवतील, त्यामुळे त्यांचे उत्पन्नही वाढेल, अशी देखील माहिती त्यांनी दिली आहे.

Agriculture News । शेतकऱ्यांनो, करा ‘या’ औषधी वनस्पतीची शेती, तीन महिन्यात मिळतील तीन लाख रुपये

मंगेश शिवराजप्पा धनासुरे हे शेतकरी निलंगा तालुक्यातील लिंबाळा गावचे रहिवासी आहेत. त्यांनी गावातच साडेसहा एकर जमिनीवर पपईची लागवड केली आहे. डिसेंबर 2022 मध्ये त्यांनी पपईच्या सुमारे 7000 रोपांची पेरणी केली होती. त्यासाठी 6 लाख रुपये खर्च आला. अवघ्या 8 महिन्यांनी शेतीतून पपईचे उत्पादन सुरू झाले. गेल्या ऑगस्टपासून ते पपईची विक्री करत असून त्यांनी आतापर्यंत २४ लाख रुपयांची पपई विकली आहे.

Animal Husbandry । बापरे! तब्बल 11 कोटींची म्हैस, महिन्याला येतोय अडीच ते तीन लाखांचा खर्च

18 लाखांचा नफा

शेतकरी मंगेश यांनी सांगितले की, ते दर 15 दिवसांनी सुमारे 20 टन पपई तोडतात. त्यांना बाजारात 20 रुपये किलो दर मिळत आहे. अशा स्थितीत 15 दिवसांत तो 3 लाख रुपये कमावत आहे. त्यामुळे अवघ्या 4 महिन्यांत त्याने 24 लाखांची कमाई केली आहे. खर्च वगळल्यास, मंगेश शिवराजप्पा यांनी 4 महिन्यांत 18 लाख रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. त्यामुळे त्यांची सगळीकडे चर्चा होत आहे.

Cotton Rate । कापूस उत्पादकांना अच्छे दिन! कापसाचे दर ८ हजारांवर

टरबूज विकूनही कमावला बक्कळ नफा

मंगेश यांनी पपईची लागवड केल्यानंतर त्यांनी त्याच शेतीमध्ये टरबुजाची देखील लागवड केली. यंदा त्यांनी साडेसहा एकर पपईच्या शेतात टरबूजाची लागवड केली. त्यासाठी 4 लाख रुपये खर्च आला.पण 4 महिन्यांनी त्यांनी 160 टन टरबूज विकून 18 लाख रुपये कमावले. त्याचबरोबर येत्या वर्षभरात पपईच्या बागेतून सुमारे ६५ लाख रुपयांचा नफा मिळण्याची अपेक्षा असल्याचे शेतकरी मंगेश यांनी सांगितले आहे.

Agriculture Electricity । वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट! रब्बी हंगाम धोक्यात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *