Accidental Insurance । शेतात काम करत असताना अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमवावा लागतो. घरातील कर्ता पुरुष गेल्याने त्या संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर तर कोसळतोच शिवाय आर्थिक समस्येला सामोरे जावे लागते. शेतकऱ्यांची हीच अडचण लक्षात घेता सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना (Gopinath Munde Farmer Accident Safety Relief Scheme) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला २ लाख रुपये मिळतात.
आता या योजनेमध्ये (Gopinath Munde Farmer Accident Scheme) सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. पूर्वी अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या एकाच नातेवाईकाला नुकसान भरपाई दिली जात होती. परंतु आता अपघातग्रस्त शेतकऱ्यांस आणि त्यांच्या कुटुंबास आर्थिक लाभ देण्यासाठी राज्यातील सर्व वहिवाटीधारक खातेदार शेतकरी आणि शेतकऱ्याच्या कुटुंबातील वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसणारा कोणताही एक सदस्य म्हणजे (आई-वडील, शेतकऱ्याची पती/पत्नी, मुलगा आणि अविवाहीत मुलगी यापैकी कोणत्याही एका व्यक्तीला) अशा दोन जणांना लाभ घेता येईल.
Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील २४ तासांत या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस
कोणाला मिळणार लाभ?
या योजनेचा लाभ राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी आणि खातेदार म्हणून नोंद नसणारे शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य अशा १० ते ७५ वर्ष वयोगटातील दोन जणांना योजनेचा (Government Scheme) लाभ मिळेल.
Agriculture News । शेतकऱ्यांनो, करा ‘या’ औषधी वनस्पतीची शेती, तीन महिन्यात मिळतील तीन लाख रुपये
आवश्यक कागदपत्रे
- मृत्यूचा दाखला
- शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाठ्याकडील गाव नमुना नंबर 6 क नुसार वारसाची नोंद
- सातबारा उतारा
- आधार कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र
- वारसदाराचे आधार कार्ड आणि बँक पासबूक
- मृत्यूचा प्रथम माहिती अहवाल किंवा पोलीस पाटलाचा अहवाल
Animal Husbandry । बापरे! तब्बल 11 कोटींची म्हैस, महिन्याला येतोय अडीच ते तीन लाखांचा खर्च
या ठिकाणी करा अर्ज
शेतकऱ्याच्या अपघाती मृत्यूच्या १ महिन्याच्या आत त्याबाबतचा प्रस्ताव तालुका कृषी अधिकाऱ्याकडे करावा लागेल. एका साध्या कागदावर अपघाताविषयीची सविस्तर माहिती लिहून देखील अर्ज करू शकता.
Agriculture Electricity । वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट! रब्बी हंगाम धोक्यात
हे अपघात पात्र
- पाण्यात बुडून मृत्यू
- जंतुनाशके हाताळताना किंवा अन्य कारणामुळे विषबाधा
- विजेचा धक्का बसल्यामुळे झालेला अपघात
- रस्ता किंवा रेल्वे अपघात
- वीज पडून मृत्यू
- खून
- उंचावरून पडून झालेला अपघात
- बाळंतपणातील मृत्यू
- दंगल
- सर्पदंश आणि विंचूदंश
- जनावरांच्या खाल्ल्यामुळे/चावण्यामुळे जखमी किंवा मृत्यू