Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! महाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पडणार जोरदार पाऊस, जाणून घ्या हवामान खात्याचा इशारा

हवामान

Havaman Andaj । यावर्षीही निसर्गाच्या लहरीपणाचा फटका राज्याला बसत आहे. काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार अवकाळी पावसाने (Weather update) हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. अवकाळी पावसामुळे (Heavy Rain) खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, रब्बी हंगामात पावसाने पाठ (Heavy Rain in Maharashtra) फिरवल्याने पिके जळून गेली होती, खरीप हंगामात पावसामुळे पिकांची नासाडी झाली. यामुळे शेतकरी हतबल झाले आहेत.

Success Story । मानलं बुवा! शिक्षकाचा शेतीत यशस्वी प्रयोग, मिळवलं पेरूचं 24 लाखांचं उत्पादन

मिचॉन्ग चक्रीवादळाचा (Cyclone Michong) फटका देशाला बसत आहे. चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात आज मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान खात्याने (IMD Alert) वर्तवला आहे. हे चक्रीवादळ तामिळनाडूला सोडून आंध्र किनारपट्टीवर धडकलं असून आंध्र प्रदेशातील सात जिल्ह्यांतील 9,454 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. येथे हवामान खात्याने सतर्कतेचा इशारा दिला आहे. (IMD Update)

Inflation । सर्वसामान्यांना मोठा झटका! ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या डाळींच्या किमती

या ठिकाणी पडणार पाऊस

हवामान खात्याने आज चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, गडचिरोली आणि गोंदियात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शिवाय वातावरण देखील ढगाळ राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पुढील दोन दिवस पुणे आणि परिसरात हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे, विदर्भ आणि मराठवाड्यात आज आणि उद्या तुरळक ठिकाणी पाऊस पडेल.

Supriya Sule । राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा; सुप्रिया सुळेंची लोकसभेत मागणी

केंद्र आणि राज्य सरकार सतर्क

चक्रीवादळाचा धोका लक्षात घेता केंद्र आणि राज्य सरकार सतर्क झाले आहेत. काल हे वादळ तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकले आहे. या वादळाच्या प्रभावामुळे तामिळनाडू आणि आसपासच्या सर्व राज्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. या चक्रीवादळाचा प्रभाव पश्चिम बंगालच्या किनारी भागातही दिसून येईल. तामिळनाडू आणि ओडिशामध्ये एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे.

Success Story । एकेकाळी होता ऑफिस बॉय! जिद्दीच्या जोरावर शेती करत कमावलं लाखो रुपये, वाचा यशोगाथा

तसेच राज्यात काही ठिकाणी कमाल २८ ते ३४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले आहे. राज्यात महाबळेश्वर येथे मंगळवारी १५.२ अंश सेल्सिअस नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान खात्याच्या माहितीनुसार मिचॉन्ग चक्रीवादळामुळे पूर्व विदर्भात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे

Harbhara Bajar Bhav । अर्रर्र! हरभरा दरात कमालीची घसरण, किती मिळतोय दर; जाणून घ्या..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *