Dairy Business

Dairy Business । मोठी बातमी! दूध संस्थांमधील वजन काटा रद्द होण्याची शक्यता

बातम्या

Dairy Business । प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नावरही खूप मोठा परिणाम होतो. बऱ्याचवेळा शेतकऱ्यांनी पिकवलेल्या भाज्यांना खूप कमी भाव मिळतो. परिणामी शेतकऱ्यांना ती फेकून द्यावी लागतात. अनेकजण शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय सुरु करतात. या व्यवसायात त्यांना चांगला फायदा होतो.

Havaman Andaj । सावधान! पुढचे तीन दिवस ‘या’ भागाला बसणार वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा तडाखा

दुधाच्या दरात (Milk Price) सतत बदल होत असतात. दरम्यान, राज्यातील दूध संस्थांमध्ये वापरले जाणारे वजन काटे (Milk Meter) अचूक नसतात. महत्त्वाचे म्हणजे या काट्यांवर 100 मिलिपेक्षा कमी दुधाचे मोजमाप होत नाही. या कारणामुळे दूध उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे हे काटे अचूक करावेत, अशी मागणी सातत्याने केली जात होती. याच संदर्भात आता एक महत्त्वाची बातमी आहे.

Navratri 2023 । काय आहे शेतीच्या दृष्टीनं घटस्थापनेचं महत्व? जाणून घ्या

सध्या राज्यातील दूध संस्थांमध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काट्यावर दूध संकलन होते. या काट्यांवर 100 मिलिपेक्षा कमी दुधाचे मोजमाप केले जात नाही. इतकेच नाही तर 100 ग्रॅमची सूट ही एका दिवशी 1 हजार किलो वजनाच्या वजन काट्यासाठी वापरतात. परंतु, दूध संस्थांमध्ये शंभर ते दीडशे किलो वजनाच्या काट्यांसाठी 100 ग्रॅमचे मोजमाप करत नाही. त्यामुळे दूध उत्पादक कमालीचे नाराज झाले आहेत.

Snakes Farming । ऐकावं ते नवलच भाऊ! येथे सापाचीही करतात शेती, कसं असतं नियोजन? जाणून घ्या

याचा पार्श्वभूमीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने बुधवारी (ता. 18) बैठक बोलविली आहे. या बैठकीला वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांना बोलविण्याचे आदेश दिले आहेत. या बैठकीत वजन काटा रद्द होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हा निर्णय झाला तर त्याचा थेट फायदा दूध उत्पादकांना होईल. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Pumpkin Farming । बापरे! पाच फुटांचा भोपळा, अशाप्रकारे करा लागवड; मिळेल भरघोस नफा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *