Wheat Farming । सध्या रब्बी हंगाम सुरू असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गहू हे पीक आहे. राज्यासह देशातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गहू गव्हाची पेरणी झाली आहे. आपल्याकडीन अनेक शेतकरी गहू लागवडीस प्राधान्य देत आहेत. सध्या शेतकऱ्यांचे गहू पीक चांगले जोमात असून गव्हाला ओंब्या यायला सुरवात झाली आहे. मात्र शेतकऱ्यांसाठी सर्वात चिंताजनक बाब म्हणजे गव्हामध्ये असलेला उंदरांचा सुळसुळाट. अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये उंदराने सुळसुळाट घातला आहे. यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत आहेत. मात्र आज आम्ही तुम्हाला असे जुगाड सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही उंदरांवर नियंत्रण मिळू शकता. (Wheat Farming Rats Infested)
काही शेतकऱ्यांच्या गव्हाला ओंब्या भरणीला सुरुवात झाली आहे तर काही शेतकऱ्यांच्या गव्हात ओंब्या भरणीला आगामी काळात सुरुवात होईल. यामध्ये उंदीर गहू पिकाला त्रास देण्यास सुरुवात करू शकतो. उंदीर प्राणी लहान आकाराचा असून तो गहू कमी खातो मात्र गव्हाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करतो. ज्यामुळे शेतकऱ्यांना उंदराचा बंदोबस्त करणे हे एक आव्हान असते. जर वेळीच उंदराचा बंदोबस्त केला नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागते. चला तर मग जाणून घेऊया उंदराचा बंदोबस्त कसा करावा?
उंदराचा बंदोबस्त कसा करायचा?
पहिल्यांदा आपल्या गव्हाच्या शेतातील सर्व उंदरांची बिळे पहा. यानंतर या बिळांवर घरगुती पिठाचे छोटे गोळे करून ठेवा. ज्यामुळे तुम्हाला उंदरांचा अधिवास लक्षात घेण्यात मदत होईल. दोन ते तीन दिवस गव्हाच्या शेतात सर्व बिळांवर पिठाचे गोळे ठेवा. यानंतर जर बिळावर ठेवलेले पिठाचे गोळे गायब होत असतील तर आपल्या शेतात उंदरे आहेत हे शेतकऱ्यांच्या लक्षात येते.
आपल्या शेतात उंदीर असल्याची गोष्ट लक्षात येताच बाजारात झिंक फॉस्फाईड नावाची पावडर उपलब्ध आहे. ती विकत घेऊन तिला पिठाच्या गोळ्यात भरा आणि त्या गोळ्या उंदरांच्या बिळाजवळ ठेवा. त्या गोळ्या खाऊन देखील उंदीर नष्ट होऊ शकतात.
त्याचबरोबर दुसरे जुगाड म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी गव्हामध्ये उंदरांची बिळे आहेत त्या ठिकाणी एक मोठे लाकूड उभा करू शकता. त्यामुळे लाकडावर बसून शिकार करणारे पक्षी उंदीर बाहेर येण्याची प्रतीक्षा करू शकतात. यामुळे पक्षांना उंदराची शिकार करण्यास मदत होते आणि आपल्या शेतातील उंदीरही नष्ट होतात.