Success story

Success story । शेतकऱ्याची बातच न्यारी! ‘या’ देशातून इंम्पोर्ट केलं बाजरीचं बियाणं, आली 3 फुटाची कणसे

यशोगाथा

Success story । अलीकडच्या काळात कृषी क्षेत्राचा विकास झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते. शेतकरी आता वेगवेगळी तंत्र वापरून शेती करू लागला आहे. ज्यामुळे वेळेची आणि पैशांची बचत होते. तंत्रज्ञानामुळे दर्जेदार वाणांची निर्मिती झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न मिळत आहे. नेहमीपेक्षा जास्त उत्पन्न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे पाहायला मिळते.

Gold Fish Farming । ‘सुवर्ण’ कमाई करून देणारा व्यवसाय, कमी खर्चात घरबसल्या अशी करा सुरुवात

सध्या सुगीचे दिवस सुरु आहेत. ठिकठिकाणी बाजरी काढणीची लगबग सुरु आहे. आतापर्यंत तुम्ही ठराविक उंचीचे बाजरीचे कणीस (Bajara crop) पाहिले असेल. पण तुम्ही कधी 3 फुटाची कणसे पाहिली आहेत का? एका शेतकऱ्याने एक वेगळा प्रयोग केला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील कुची या गावच्या श्रीकांत फाकडे या शेतकऱ्याने चक्क तुर्कस्तान वरून ऑनलाईन बाजरीचे बियाणे (Turkestan Bajara Seed) मागविले.

Havaman Andaj । तापमानात घट झाल्याने थंडीची चाहूल, ‘या’ ठिकाणी कोसळणार जोरदार पाऊस

त्याची लागवड केली आहे, हे पीक काढणीला आले आहे. त्यातून त्यांना भरघोस उत्पन्न मिळेल. श्रीकांत फाकडे यांच्याकडे कोरडवाहू शेती आहे. त्यात त्यांनी बाजरी लागवड करण्याचा निर्णय घेतला. लागवडीसाठी त्यांनी तुर्कस्थानमधून एकूण प्रतिकिलो पंधराशे रुपये या दराने बाजरीची बियाणे ऑनलाईन ऑर्डर केली. एका एकरसाठी एक किलो याप्रमाणे त्यांनी एक एकर जमिनीमध्ये बाजरीची लागवड (Turkestan Bajara Cultivation) केली.

Agriculture News । फुलांनी सजल्या बाजारपेठा, किलोला मिळतोय विक्रमी दर

अशी केली लागवड

दोन फुटावर एक बी अशी त्यांनी लागवड केली. महत्त्वाचे म्हणजे तुर्कस्तानातील बाजरीची चव आपल्या गावराण बाजरी सारखीच असते. शिवाय ती आरोग्यवर्धक असते. बाजरीच्या या वाणास टपोरे दाणे येतात. काही शेतकऱ्यांनी पस्तीस ते पन्नास क्विंटल बाजरीचे उत्पादन मिळते असा दावा केला आहे.

Success story । यूट्यूबवर मिळाली प्रेरणा आणि वयोवृद्ध शेतकऱ्यानं केली ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती, कसे केलं नियोजन? पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *