Havaman Andaj

Havaman Andaj । तापमानात घट झाल्याने थंडीची चाहूल, ‘या’ ठिकाणी कोसळणार जोरदार पाऊस

हवामान

Havaman Andaj । देशासह राज्यातून मान्सून माघारी फिरला आहे. यावर्षी अपेक्षित पाऊस पडला नाही. धरणाची पाणीपातळी कमी आहे. राज्याच्या काही भागात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्रात नागरिकांना उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. पुढील 24 तासांनंतर उष्णता आणखी वाढू शकते, असा अंदाज हवामान खात्याने (IMD Alert) व्यक्त केला आहे.

Agriculture News । फुलांनी सजल्या बाजारपेठा, किलोला मिळतोय विक्रमी दर

दरम्यान, दिल्लीमध्ये पावसाच्या हजेरीनं वातावरणात गारवा पसरला आहे. उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरमध्येही तापमानात घट नोंदवली आहे. जम्मू काश्मीर प्रांतातही हिवाळ्याची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच चारधाम यात्रा मार्ग, केदारनाथ धाम या ठिकाणी बर्फवृष्टी झाली आहे. पुढील 24 तासांमध्ये येथे हिमवृष्टी सुरु राहील.

Success story । यूट्यूबवर मिळाली प्रेरणा आणि वयोवृद्ध शेतकऱ्यानं केली ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती, कसे केलं नियोजन? पहा

तापमानात घट

हलका पाऊस (Rain Alert) आणि थंड वाऱ्यांमुळे दिल्लीच्या कमाल तापमानात पाच अंश सेल्सिअसने घसरण झाली आहे. मागील 24 तासांत पारा 36.5 वरून 30.5 वर गेला आहे. किमान तापमानही कमी होऊ शकते. जरी अरबी समुद्रात संभाव्य चक्रीवादळाचे पहिले संकेत हवामान तज्ज्ञांना मिळाले असले तरी त्याच्या तीव्रतेबाबत अजून कोणतीच माहिती मिळाली नाही. दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि लगत असणाऱ्या लक्षद्वीप परिसरात चक्री वाऱ्यांचे क्षेत्र आहे.

Kharif Season । शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, सरकारतर्फे पैसेवारी जाहीर करण्यास उशीर

चक्रीवादळाची शक्यता

भारतीय हवामान खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, त्याच्या प्रभावामुळे त्याच भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होईल. आतापर्यंतच्या मॉडेलच्या अंदाजांमध्ये एकसमानता नसून आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल, तर स्पष्ट चित्र समोर येईल.

Forbes Billionaires List । जिंकलस पोरा! फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत शेतकऱ्याच्या मुलाचा डंका, संपत्ती जाणून व्हाल चकित

तेज वादळ

दरम्यान, बंगाल उपसागर आणि अरबी समुद्रात समुद्राच्या उबदार तापमानामुळे चक्रीवादळ तयार होण्यासाठी ऑक्टोबर ते डिसेंबर हा अनुकूल काळ असेल. 2022 मध्ये मॉन्सून नंतरच्या काळात अरबी समुद्रावर कोणतेही उष्णकटिबंधीय वादळ तयार झाले नसून दोन उष्णकटिबंधीय वादळे – सीतारंग आणि मंडौस – बंगालच्या उपसागरात तयार झाली आहेत.अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. हिंदी महासागर क्षेत्रात चक्रीवादळांच्या नावासाठी स्वीकारलेल्या सूत्रानुसार, हिंद महासागरात उष्णकटिबंधीय वादळ निर्माण झाले तर त्याला ‘तेज’ असे नाव दिले जाईल.

Land Registry । कामाची बातमी! शनिवार-रविवारीही करता येणार जमिनीची खरेदी-विक्री, आठवडाभर सुरु राहणार कार्यालये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *