Success story

Success story । यूट्यूबवर मिळाली प्रेरणा आणि वयोवृद्ध शेतकऱ्यानं केली ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती, कसे केलं नियोजन? पहा

यशोगाथा

Success story । भारत हा कृषिप्रधान देश आहे. भारतात अनेक पिकांचे उत्पादन घेण्यात येते. शेतकरी आता पारंपरिक पिकाला फाटा देत आधुनिक शेतीकडे वळाले आहेत. जर तुम्हाला शेतीतून भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला शेतीत खूप मेहनत करावी लागते. शेतकरी आता आधुनिक शेतीमधून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवू लागले आहेत. यासाठी योग्य ते नियोजन करणे महत्त्वाचे आहे.

Kharif Season । शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ, सरकारतर्फे पैसेवारी जाहीर करण्यास उशीर

शेतकरी आता यूट्यूबच्या मदतीने शेती करू लागले आहेत. अशीच यशस्वी शेती एका 75 वर्षीय शेतकऱ्याने करून दाखवली आहे. रामकृष्ण सुबेका असे त्यांचे नाव आहे. ते झारखंडमधील जमशेदपूर येथे राहतात. त्यांनी आपल्या शेतात ड्रॅगन फ्रूटची (Dragon Fruit) लागवड केली आहे. त्यातून त्यांना 10 लाखांहून जास्त नफा मिळाला आहे. यातून त्यांनी यशाला वयाची अट नाही तर हिंमत लागते, हे दाखवून दिले आहे. (Dragon Fruit Farming)

Forbes Billionaires List । जिंकलस पोरा! फोर्ब्सच्या श्रीमंतांच्या यादीत शेतकऱ्याच्या मुलाचा डंका, संपत्ती जाणून व्हाल चकित

अशी केली सुरुवात

रामकृष्ण सुबेका हे नक्षलग्रस्त भाग असणाऱ्या चकुलियामध्ये शेती करतात. 2020 मध्ये त्यांनी यूट्यूबवर ड्रॅगन फ्रूटचा एक व्हिडीओ पाहिला होता. त्यावेळी लोकडाऊन सुरु होते. व्हिडीओ पाहिल्यानंतर त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती (Dragon Fruit Cultivation) करण्याचा निर्णय घेतला. महत्त्वाचे म्हणजे त्यांच्याच कुटुंबीयांनी त्यांची या निर्णयावरून चेष्टा केली होती. परंतु कोणतीही पर्वा न करत त्यांनी ड्रॅगन फ्रूटची लागवड केली.

Land Registry । कामाची बातमी! शनिवार-रविवारीही करता येणार जमिनीची खरेदी-विक्री, आठवडाभर सुरु राहणार कार्यालये

कमाई

त्यांनी लागवडीसाठी बांगलादेशातून रोपे आयात केली. पहिल्या वर्षी त्यांना 50 हजारांपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले. एका झाडाला 20 वर्षे फळे येतात. रामकृष्ण यांनी अवघ्या दोन वर्षांत ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीतून लाखो रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. यात आणखी वाढ होईल असे रामकृष्ण यांनी सांगितले आहे. त्यांच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे कुटुंबासह समाजातून कौतुक केले जात आहे.

Modern Agricultural Machine । भारीच की राव! ‘या’ यंत्राच्या मदतीने काही तासात होते गव्हाची कापणी, किंमतही आहे खूपच कमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *