Onion rate

Onion rate । कांद्याच्या दरात कमालीची घसरण, किलोला मिळतोय 1 ते 8 रुपये दर

बाजारभाव

Onion rate । दरवर्षीप्रमाणे यंदाही कांद्याने (Onion) शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. सरकारने निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. सरकारने निर्यातबंदी (Onion export ban) लागू केल्याने कांद्याच्या दरात कमालीची घसरण झाली आहे. असे असूनही सरकार (Government) निर्यातबंदीचा निर्णय मागे घेत नाही. घसरलेल्या दरांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

Farmers Help । शेतकऱ्याची बैलजोडी गेली चोरीला, सोशल मीडियावर समजताच केली चक्क 80 हजाराची मदत

कांदा निर्यातबंदी

राज्यात लवकरच लोकसभेच्या निवडणुका (Loksabha election) पार पडणार आहेत. त्यामुळे सरकारला कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घ्यायचा नाही. कोणत्याही शेतमालाचे दर वाढून द्यायचे नाही, असे सरकारचे धोरण असल्याचे पाहायला मिळत आहे. याचाच अर्थ असा की शेतकऱ्यांना आता मोफत कांदा वाटावा, अशी सरकारची इच्छा आहे, असे मत कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. (Onion rate in market)

Farmer Accident Insurance । मोठी बातमी! अपघात विम्यापोटी 48 कोटींचा निधी मंजूर

किलोला मिळतोय ‘इतका’ दर

दरम्यान, राज्यातील सोलापूरसह राहुरी बाजार समितीत कांद्याला फक्त 1 ते 8 रुपये प्रतिकिलोचा दर (Onion price) मिळत आहे. याच कारणामुळे आता राज्यातील शेतकरी कांद्याची शेती सोडून इतर पिकांची लागवड करण्यास प्राधान्य देत आहेत. कांद्याची निर्यातबंदी केल्याने शेतकऱ्यांना 1 रुपये ते 8 रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. असे असूनही सरकार निर्यातबंदीचा निर्णय मागे घेत नाही.

Success Story । इंजिनीअरिंगच्या नोकरीला ठोकला रामराम! टोमॅटोच्या शेतीतून ‘हा’ पठ्ठया मिळवतोय लाखोंचा नफा

सोलापूरच्या बाजारात 10 फेब्रुवारी रोजी केवळ 34250 क्विंटल कांद्याची आवक झाली, तरीही येथील किमान दर 100 रुपये प्रतिक्विंटल राहिला. महत्त्वाचे म्हणजे एक लाख क्विंटलपेक्षा जास्त आवक होण्यासाठी हाच दर होता. येथे 8 फेब्रुवारी रोजी कमाल दर 1800 रुपये तर सरासरी दर 1000 रुपये प्रतिक्विंटल होता. तर राहुरी मंडईत 5658 क्विंटल कांद्याची आवक झाली असून येथे किमान दर 100 रुपये प्रतिक्विंटल आहे.

Maize Crop । ऐकावे ते नवलंच! मक्याचं कणीस हिरवं पण त्यात दाणे काळे, कसं ते जाणून घ्या

कमाल दर 1500 रुपये तर सरासरी दर 900 रुपये प्रतिक्विंटल तर मनमाड मंडईत अवघी चार हजार क्विंटल कांद्याची आवक झाली. असे असूनही शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल 200 रुपये किमान दर मिळाला. कमाल दर 1300 रुपये तर सरासरी दर 1000 रुपये प्रतिक्विंटल होता. कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने बाजार समित्यांमध्ये कांदा निम्यापेक्षा जास्त दराने कोसळला आहे.

Mango Pest । आंब्यांला बसला हवामानाचा मोठा फटका! फुलकिडीने शेतकरी हैराण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *