Havaman Andaj । राज्याच्या अनेक भागात मागच्या दोन-चार दिवसापासून पावणे थैमान घातले आहे. अनेक दिवस पावसाने ओढ दिली होती मात्र सध्या पाऊस पडल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. सध्या राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस होत आहे तर काही भागात हलक्या सारी कोसळत आहेत. दरम्यान हवामान विभागाने पावसाबाबत आता पुन्हा एक मोठी अपडेट दिली आहे.
Buldhana Rain । मुसळधार पावसाने बुलढाण्याला झोडपले! १२५ घरांचे नुकसान तर ७६ जनावरे गेली वाहून
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पुढील तीन दिवस जोरदार पावसाचा इशारा म्हणजेच येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने मराठवड्यातील छत्रपती संभाजीनगर, नांदेड, बीड, जालना,धाराशिव, लातूर, हिंगोली. परभणी, विदर्भातील बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, गडचिरोली, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपुर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात बहुतांश जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
त्याचबरोबर हवामान विभागाने, कोंकणातील पालघर, मुंबई, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यासह खानदेशातील जळगाव, नाशिक तर मध्य महाराष्ट्रातील सोलापूर, तसेच कोल्हापूर, पुणे, अहमनगर, सांगली, सातारा जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने जारी केला आहे.
Ahmdnagar Rain News । अनेक दिवस ओढ दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यात तुफान पाऊस
धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ
राज्यात पावसाची संततधार सुरु असल्यांमुळे अनेक धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिकांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. जायकवाडी असेल किंवा पुण्याचे खडकवासला धरण असेल या मोठ्या धरणांमध्ये पाणीपातळीत चांगली वाढ झाली आहे.
Sitafal Rate । सीताफळाचे दर तेजीत; मिळतोय ९ हजार रुपये पर्यंत दर; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण