Agricultural News । राज्यातील अनेक शेतकरी फळबागांची मोठ्या प्रमाणात लागवड करतात, राज्य सरकारकडून त्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात. परंतु अनेकांना या योजनांची माहिती नसते त्यामुळे काही शेतकरी यापासून वंचित राहतात. राज्य शासनाकडून फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी २०१८-१९ पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना सुरु केली आहे.
ही योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबवण्यात येते. शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी ५०%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात अनुदान दिले जाते. परंतु आता या योजनेत बदल झाला आहे. यात आता १५ फळपिकांचा समावेश केला आहे. तसेच यापुढे ठिबक सिंचनाऐवजी खतांसाठी १०० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत अर्थसंकल्पात निधीची तरतूद केली आहे, अशी माहिती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे.
Ahmdnagar Rain News । अनेक दिवस ओढ दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यात तुफान पाऊस
झालेले बदल
या योजनेत ‘ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे’ या बाबी ऐवजी ‘रासायनिक आणि सेंद्रीय खते देणे’ ही बाब समाविष्ट केली आहे.
या योजनेअंतर्गत शासन अनुदानीत बाबींच्या प्रती हेक्टरी सुधारित मापदंडांना मंजूरी दिली आहे. यापूढे जिवंत झाडांचे प्रमाण निश्चित केल्यानुसार प्रमाणात दिसुन आले तर लाभार्थीना देय असलेले अनुदान तीन वर्षांत ५०:३०:२० या प्रमाणात न देता अंदाजपत्रकामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षामध्ये देय दर्शविण्यात आलेल्या अनुदानाप्रमाणे देण्यास मान्यता मिळाली.
Sitafal Rate । सीताफळाचे दर तेजीत; मिळतोय ९ हजार रुपये पर्यंत दर; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण
दरम्यान, राज्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले आहे. जर गरज भासली तर १०० कोटींच्या तरतुदीमध्ये आणखी वाढ केली जाईल, अशीही माहिती धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्यामुळे ज्यांनी या योजनेचा लाभ घेतला नसेल त्यांनी आजच या योजनेचा लाभ घ्या.