Buldhana Rain । बुलढाणा : प्रदीर्घ कालावधींनंतर राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. राज्यातील अनेक जिल्हे पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहेत. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, पाऊस पडत नसल्याने पिण्याच्या पाण्यासह शेतीचा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच राज्यात येत्या 3 दिवसात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
बुलढाणा जिल्ह्यातदेखील मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने थैमान घातले आहे. मागील दोन दिवसांपासून येथे जोरदार पाऊस पडत आहे. नांदुरा तालुक्यातील लोणवडी, पिंपळखुटा धांडे, खडदगाव, आणि माळेगाव गोंड या चार गावात ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. वडनेर परिसरात अवघ्या एक तासात तब्बल ८१.५ मिमी आणि महाळुंगे परिसरात ८० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
दमदार पावसामुळे १२५ घरांचे मोठे नुकसान झाले आहे. ७६ जनावरे वाहून गेल्याची माहिती आहे. तसेच ११ जनावरांचा मृत्यू झाला आहे. शेतीचेदेखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशी माहिती तहसीलदार दिगंबर मुकुंदे यांनी दिली आहे. मुसळधार पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Ahmdnagar Rain News । अनेक दिवस ओढ दिलेल्या अहमदनगर जिल्ह्यात तुफान पाऊस
‘या’ जिल्ह्यात कोसळणार मुसळधार पाऊस
मागील आठवड्यापासून राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने थैमान घातले आहे. पावसाचा जोर आणखी ३ दिवस असेल. पुणे जिल्ह्यात आजपासून ३ दिवस मुसळधार पाऊस पडेल. विदर्भामध्ये वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर,नागपूर, गडचिरोली, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांना यलो अलर्ट हवामान खात्याने जारी केला आहे. पुढचे तीन दिवस या जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडेल.
Sitafal Rate । सीताफळाचे दर तेजीत; मिळतोय ९ हजार रुपये पर्यंत दर; शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण