Farmers Protest

Farmers Protest । दिल्लीच्या सीमेवर तणाव वाढला, पोलिसांनी सोडल्या ड्रोनमधून अश्रूधुराच्या नळकांड्या

बातम्या

Farmers Protest । तीन कृषी कायदे (Agricultural Laws) रद्द करताना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलन (Delhi Farmers Protest) सुरु केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला आहे. तर शेतकऱ्यांना दिल्लीत येऊ द्यायचं नाही, असा पवित्रा पोलिसांनी घेतला आहे.

Crop Insurance Scheme । धनंजय मुंडे यांनी केली सर्वात मोठी घोषणा!

पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये धुमश्चक्री

शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शेतकऱ्यांना अडवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा दिल्लीच्या (Delhi) सीमांवर तैनात केला आहे. काल रात्रभर पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये (Police vs farmers) धुमश्चक्री पाहायला मिळाली. दिल्लीच्या तिन्ही सीमा सील (Border seal) केल्याने वाहतूक कोंडीची परिस्थिती निर्माण झाली आहे. (Guarantee Act)

Havaman Adnaj । महाराष्ट्रासह १५ राज्यांमध्ये मुसळधार पावसासह गारपीटीची शक्यता, जाणून घ्या हवामान अंदाज

महत्त्वाचे म्हणजे रस्तेमार्ग बंद केले असल्याने शेतकरी मिळेल त्या रस्त्याने दिल्लीत शिरण्याचा प्रयत्न करत आहेत. काल हरियाणा-पंजाबला जोडणाऱ्या शंभू सीमेवर शेतकऱ्यांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करताना बॅरिकेड्सही तोडले आहेत. इतकेच नाही नाही तर पोलिसांनी शेतकऱ्यांना पांगवण्यासाठी ड्रोनमधून अश्रूधुराच्या नळकांड्या देखील सोडल्या.

Cow Milk Increase Tips । जनावरांच्या दूध उत्पादनात वाढ करायची असेल तर कुट्टीमध्ये मिसळा ‘या’ गोष्टी; वाचा महत्त्वाची माहिती

यावेळी 100 हून अधिक शेतकरी आणि पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. अनेक शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. रात्रभर हा गोंधळ सुरू होता. दरम्यान, हिमाचल रोड ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनने दिल्लीला येणाऱ्या बसेस बंद केल्या असून हिमाचलहून दिल्लीला येणाऱ्या सर्व बसचे मार्ग चंदीगडपर्यंत मर्यादित केले आहेत. नागरिकांना प्रचंड ट्रॅफिक जामचा सामना करावा लागतोय.

Delhi Farmers Protest । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा ‘दिल्ली चलो’ आंदोलनाला पाठिंबा

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा आंदोलनाला पाठिंबा

दरम्यान, शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनीही पाठिंबा दिला आहे. संयुक्त किसान मोर्चाच्या (अराजकीय) नेतृत्त्वात पंजाब, हरियाणातील शेतकऱ्यांनी सर्व पिकांसाठी हमीभावाचा कायदा करण्याची प्रमुख मागणी केली असून यात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागणीचा अप्रत्यक्षरित्या समावेश होतोय. त्यामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहे.

Unseasonal Rain । शेतकऱ्यांना मोठा फटका! अवकाळी पावसामुळे ३८ हजार हेक्‍टरवरील शेतीचे नुकसान

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *