Kharip Pik Vima

Kharip Pik Vima । आनंदाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड, मिळणार ६१३ कोटींची विमा भरपाई

बातम्या

Kharip Pik Vima। शेतकऱ्यांना दरवर्षी आस्मानी संकटांचा सामना करावा लागतो. या संकटांमुळे शेतकरी हतबल होतो. त्यामुळे ते टोकाचा निर्णय घेतात. शेतकऱ्यांची हीच स्थिती लक्षात घेता सरकार विविध योजना राबवत असते. दरम्यान, शेतकऱ्यांना अजूनही खरीप पीक विमा योजनेची (Kharif Crop Insurance Scheme) नुकसान भरपाई मिळाली नाही. याच शेतकऱ्यांसाठी आता एक दिलासादायक बातमी आहे.

Onion Price । शेतकऱ्यांना कांदा रडवणार? दर कमी करण्यासाठी सरकारचा नवा डाव, ‘या’ ठिकाणी स्वस्तात विक्री

येत्या चार दिवसात ही रक्कम मिळणार आहे. याबाबत काही दिवसांपूर्वी कृषिमंत्री धनंजय मुंडे दिल्या होत्या. त्यानुसार आता सहा जिल्ह्यांमधील सुमारे १३ लाख शेतकऱ्यांना ६१३ कोटी रुपयांची नुकसान भरपाई (Crop Insurance) मिळणार आहे. पेरणी न झालेल्या सांगली आणि पुणे जिल्ह्यातील एकूण २६ हजार शेतकऱ्यांना तब्बल २८ कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळेल.

Havaman Andaj । नागरिकांनो, सावधान! हवामान खात्याचा ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार पैसे

तसेच परभणी, धाराशिव,अकोला, जालना अमरावती, आणि नागपूर या सहा जिल्ह्यांतील एकूण १२ लाख ८६ हजार १८५ शेतकऱ्यांना ६१३ कोटी १९ लाख रुपयांची नुकसान भरपाई दोन दिवसात मिळेल. दरम्यान, हिंगोली,लातूर, नांदेड आणि धुळे येथील विभागीय स्तरावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. येथील कंपन्यांनी सर्वच पिकांचे दावे मान्यकेल्याने शेतकऱ्यांची यादी अंतिम होऊन लवकरच नुकसान भरपाईचे वितरण होईल.

Maharashtra Drought । दुष्काळग्रस्त तालुक्यांना कोणत्या सवलती मिळणार? जाणून घ्या एकाच क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *