Onion Price

Onion Price । शेतकऱ्यांना कांदा रडवणार? दर कमी करण्यासाठी सरकारचा नवा डाव, ‘या’ ठिकाणी स्वस्तात विक्री

बातम्या

Onion Price । कांद्याला चांगले दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक झाले होते. अशातच काही दिवसांपासून कांद्याच्या दरात विक्रमी वाढ (Onion Price Hike) झाल्यामुळे शेतकरीवर्गात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा जास्त पैसे देऊन कांदा खरेदी करावा लागत आहे. परंतु आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना धक्का देणारी आणि सर्वसामान्यांना दिलासा माहिती समोर आली आहे.

Havaman Andaj । नागरिकांनो, सावधान! हवामान खात्याचा ‘या’ भागात मुसळधार पावसाचा इशारा

देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये कांद्याचे किरकोळ दर 60 ते 90 रुपयांवर गेले आहेत. कांद्याचे वाढते दर पाहता सरकारनं आता हे दर कमी करण्यासाठी ठोस पावले उचलली आहेत. सरकारनं कांद्याचा बफर स्टॉक (Buffer stock) पुन्हा काढयाला सुरुवात केली आहे. सध्या देशातील 170 शहरे आणि 685 केंद्रांवरील स्टॉल्सवरुन 25 रुपये प्रति किलो दराने (Onion Buffer Stock) विक्री सुरु आहे.

Maharashtra Drought । दुष्काळग्रस्त तालुक्यांना कोणत्या सवलती मिळणार? जाणून घ्या एकाच क्लिकवर

या ठिकाणी मिळतोय स्वस्तात कांदा

अगोदर विकत घेतलेल्या 5 लाख टन कांद्याशिवाय, सरकार आता बफरसाठी अतिरिक्त 2 लाख टन कांद्याची खरेदी करण्याच्या तयारीत आहे. दिल्ली-एनसीआरमधील 71 ठिकाणी, वाराणसीमध्ये 10, जयपूरमध्ये 22, रोहतकमध्ये 6, श्रीनगरमध्ये 5 आणि लुधियानामध्ये 12 अशा विविध ठिकाणी मोबाईल व्हॅनद्वारे कमी किमतीत कांदा खरेदी करता येईल. त्याशिवाय इंदूर, भुवनेश्वर,भोपाळ, हैदराबाद आणि बंगळुरुमध्ये मोबाईल व्हॅनद्वारे कमी किमतीत कांद्याची विक्री केली जात आहे.

Agriculture News । पैसेवारी म्हणजे काय रे भाऊ? जाणून घ्या दुष्काळाशी असणारा संबंध

केंद्र सरकारने सध्या कांद्याच्या वाढलेल्या किंमती पाहता बफर स्टॉक बाहेर काढणे, कांदा आयात करणे अशा उपाययोजना सुरु केल्या आहेत. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून देशभरातील प्रमुख केंद्रांमध्ये बफर स्टॉकमधून वितरण सुरु आहे. किरकोळ ग्राहकांना NCCF आणि NAFED द्वारे चालवण्यात येणाऱ्या मोबाईल व्हॅनद्वारे 25 रुपये प्रति किलो दराने कांदा खरेदी करता येईल. यामुळे शेतकऱ्यांना मोठं फटका बसत आहे. (Onion Price Falls Down)

Lek Ladki Yojana । गोरगरीब मुलींना मिळणार लाखो रुपये, काय आहे सरकारची भन्नाट योजना? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *