Lek Ladki Yojana । केंद्र आणि राज्य सरकार जनतेच्या हितासाठी अनेक योजना (Government Schemes) राबवत असते. ज्याचा त्यांना खूप फायदा होत असतो. परंतु अनेकांना सरकारच्या या योजनांबद्दल माहिती नसल्याने त्याचा त्यांना लाभ घेता येत नाही. सरकार महिलांच्या सक्षमीकरणासाठी अनेक योजना (Schemes for Womens) राबवत असते. सरकारची अशीच एक योजना आहे ज्याच्या मार्फत मुलांना आता लाखो रुपये मिळणार आहेत.
Crop Milling । मळणी यंत्राद्वारे पीक काढणी करताय? घ्या आवश्यक खबरदारी, अन्यथा होईल मोठे नुकसान
सरकारच्या या भन्नाट योजनेचे नाव आहे ‘लेक लाडकी योजना’. (Schemes for Girls) आता या योजनेत राज्यातील गोरगरीब मुलींना टप्प्याटप्प्याने एक लाख रुपयांची भेट मिळणार आहे. तब्बल अडीच लाख मुलींना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
किती मिळेल रक्कम?
पिवळ्या व केशरी रेशनधारक कुटुंबात मुलींच्या जन्मानंतर पाच हजार, पहिलीत शिकत असणाऱ्या मुलींना सहा हजार रुपये, सहावीत शिकत असणाऱ्या मुलींना सात हजार रुपये, अकरावीत शिकत असणाऱ्या मुलींना आठ हजार रुपये अनुदान मिळेल. इतकेच नाही तर लाभार्थी मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाले की तिला 75 हजार रुपये रोख मिळतील.
Custard Apple । देशी सीताफळाची चवच न्यारी! मागणीमुळे दरात मोठी वाढ
लक्षात ठेवा या गोष्टी
एक मुलगा आणि एक मुलगी असल्यास या योजनेचा लाभ घेता येईल. पहिल्या अपत्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या अपत्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करत असताना आई-वडिलांनी कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करावे. समजा दुसऱ्या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आले तर एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय असेल. परंतु त्यानंतर संबंधित आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी.
Success Story । शेतकऱ्याची लै भारी कमाल! एक एकर आल्यातून केली १२ लाखांची कमाई
आवश्यक कागदपत्रे
- लाभार्थीचे आधारकार्ड
- पालकाचे आधारकार्ड
- बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
- रेशनकार्ड (पिवळे अथवा केशरी रेशनकार्ड साक्षांकित प्रत)
- मतदान ओळखपत्र
- संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा शाळेचा दाखला
- कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
- अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील
- लाभार्थीचा जन्माचा दाखला
- तसेच कुटुंबप्रमुखाचा तहसीलदार उत्पन्नाचा दाखला
Havaman Andaj । सावधान! हवामान खात्याने दिली पावसाबाबत मोठी अपडेट, जाणून घ्या