Crop Milling

Crop Milling । मळणी यंत्राद्वारे पीक काढणी करताय? घ्या आवश्यक खबरदारी, अन्यथा होईल मोठे नुकसान

कृषी सल्ला

Crop Milling । पूर्वी यंत्रांशिवाय शेती केली जात होती. परंतु जसजसा काळ बदलत गेला तसतसा बाजारात वेगवेगळी यंत्रे येऊ लागली आहेत. मनुष्यबळाची जागा आता यंत्रांनी घेतली आहे. अनेकजण शेतीसाठी आवश्यक असणाऱ्या यंत्रांची खरेदी करत आहेत. विशेष म्हणजे या यंत्रांमुळे कामे आता चुटकीसरशी होऊ लागली आहेत. वेळेची आणि खर्चाची बचत होत आहे. यंत्रांचा वापर करताना काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Fodder Crop । शेतकरी बांधवांनो, पौष्टिक चाऱ्यासाठी पर्याय शोधत आहात? तर मग लसूणघास चारा पिकाची लागवड कराच

कारण या यंत्रणेमुळे खूप अपघात होत आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व येत आहे. खास करून जर तुम्ही मळणी यंत्राद्वारे पीक काढत असाल तर सावध (Crop Milling Precautions) राहणे गरजेचे आहे. कारण तुमचा थोडासा निष्काळजीपणा तुमच्याच जीवावर बेतू शकतो. मळणी यंत्राद्वारे पीक काढत असताना तुम्ही जाणीवपूर्वक काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

Custard Apple । देशी सीताफळाची चवच न्यारी! मागणीमुळे दरात मोठी वाढ

लक्षात ठेवा या गोष्टी

 • मळणी यंत्रातुन बाहेर पडणारा भुसा व वाऱ्याची दिशा एक ठेवा.
 • यंत्राचे सर्व नटबोल्ट व्यवस्थित घट्ट बसवा.
 • यंत्रामध्ये पिकाची टाकणी एकसारखी असावी.
 • यंत्राच्या जाळ्यांची पाहणी करून त्या सतत स्वच्छ कराव्यात.
 • 8-10 तासानंतर मळणी यंत्राला विश्रांती द्या.
 • मळणी सुरु करण्यापूर्वी यंत्र मोकळे चालवून यंत्राचा कोणता भाग घासत नाही याची खात्री करा.
 • मळणी करतांना सैल कपडे घालणे टाळा.
 • मळणी यंत्रात पिक टाकत असताना चालकाने हात सुरक्षित अंतरावर ठेवा.
 • सर्वात महत्त्वाचे म्हणजे सुरक्षित मळणी करण्यासाठी ISI मार्क असणारे मळणी यंत्र वापरावे.
 • पिकाची मळणी करण्यापूर्वी पीक पूर्णपणे वाळलेले असावे.
 • तसेच पिक मळणीची जागा राहत्या घरापासून दूर आणि समतोल असावी.
 • योग्य प्रमाणात उजेड असल्यास मळणी करा.

Success Story । शेतकऱ्याची लै भारी कमाल! एक एकर आल्यातून केली १२ लाखांची कमाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *