Onion Export । केंद्र सरकारने (Central Govt) कांदा निर्यातबंदी करण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याविरोधात राज्यातील शेतकऱ्यांमध्ये केंद्र सरकारविरोधात संताप आहे. सरकारच्या याच निर्णयामुळे कांद्याचे दर (Onion rate) चांगलेच पडले आहेत. याचे पडसाद हिवाळी अधिवेशनात (Winter sessions) देखील उमटले आहेत. कांदा निर्यातबंदीवरून अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना चांगलंच घेरलं.
Land Record । ‘ही’ पद्धत वापरून जमिनीचे जुने कागदपत्र काढा! कसे ते जाणून घ्या…
निलंबनाचं नेमकं कारण आलं समोर
आज अधिवेशनादरम्यान लोकसभा अध्यक्षांनी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule), अमोल कोल्हेंसह (Amol Kolhe) ४९ खासदार निलंबित केले आहेत. आम्ही कांदा निर्यातबंदी उठवावी, ग्राहकांना स्वस्त कांदा देण्यासाठी त्यावर अनुदान द्या परंतु, निर्यात बंदी करून कांदा उत्पादकांचं कंबरडं मोडू नका. शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी (loan waiver) दिली पाहिजे, त्याशिवाय संसदेतील सुरक्षेबाबत गृहमंत्र्यांनी उत्तर द्या, अशी मागणी हे खासदार करत होते.
Onion Farmer । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, केंद्रानं घेतला महत्वाचा निर्णय
दरम्यान, काल काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chaudhary) यांच्यासह लोकसभा अध्यक्षांनी अनेक विरोधी खासदारांचे संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी लोकसभेतून निलंबन केले आहे. लोकसभेतून विरोधी पक्षाच्या खासदारांना निलंबित करण्याचे सत्र काही अजूनही थांबत नसल्याचे चित्र आहे. आतापर्यंत दोन्ही सभागृहातील 141 खासदारांवर कारवाई करण्यात आली आहे.
Urea Subsidy । अशाप्रकारे मिळते युरिया खतासाठी अनुदान, जाणून घ्या सविस्तर
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
लोकसभेतून निलंबित झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “आपण लोकशाहीतून निवडून आलो आहोत. पण अत्याचार सुरू झाले. आतापर्यंत 100 हून अधिक खासदारांना निलंबित करण्यात आले आहे. अधिकाऱ्यांना कोणताही विरोध नको होता, त्यामुळे निलंबनाची कारवाई करण्यात आली. आम्ही सरकारमध्ये असताना असे कधी केले नाही. देशाच्या गृहमंत्र्यांनी संसदेत येऊन या हल्ल्याबाबत निवेदन द्यावे आणि त्यावर चर्चा व्हावी.
Brinjal Rate । वांग्याच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचे दर
शरद पवारांची टीका
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनीदेखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. “संसदेत घुसलेल्यावर कारवाई करा. परंतु, ते सोडून त्यांच्यावर मागणी करण्यावर कारवाई करण्यात येतेय. प्रश्न विचारल्यानंतर खासदारांवर कारवाई केली जात असेल तर मोदींच्या राजकीय सत्तेत संसदेला कोणत्या पातळीवर नेले आहे, याचे हे उत्तम उदाहरण आहे,” अशी संतप्त प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.
Electric Bike । भारीच की राव! मालवाहतूक करणारी इलेक्ट्रिक बाईक, किंमतही आहे खूपच कमी