Land Record

Land Record । ‘ही’ पद्धत वापरून जमिनीचे जुने कागदपत्र काढा! कसे ते जाणून घ्या…

शासकीय योजना

Land Record । स्वतःच घर, जमीन (Land) किंवा प्लॉट खरेदी करणं हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. आपल्याकडेही स्वतःचं आलिशान घर असावं, असे सगळ्यांना वाटते. काहीजण गुंतवणुकीच्या हिशोबाने प्रॉपर्टीमध्ये (Property) पैसे लावतात. परंतु रजिस्ट्री दरम्यान त्यांची फसवणुक होते. त्यामुळे कोणतीही जमीन खरेदी (Purchase of land) असताना त्यापूर्वी त्या जमिनीची पूर्ण माहिती काढणं आणि चौकशी करणं गरजेचं असतं.

Onion Farmer । कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी, केंद्रानं घेतला महत्वाचा निर्णय

जमीन किंवा प्लॉट खरेदी (Purchase of plot) करताना त्या जमिनीची संपूर्ण माहिती (Land information) आपल्याकडे कागदपत्रांसहित (Land documents) असावी. आपल्याकडे त्या जमिनीचे जुने कागदपत्र असावे लागते. त्यावरून तुम्हाला त्या जमिनीचा खरा मालक किंवा त्या जमिनीच्या अगोदर झालेले सर्व व्यवहार माहीत असणे खूप गरजेचे आहे. जर तुम्ही याकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला त्याचा फटका बसेल.

Urea Subsidy । अशाप्रकारे मिळते युरिया खतासाठी अनुदान, जाणून घ्या सविस्तर

तुम्हाला आता महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाइटवरून जमिनीशी संबंधित कोणतीही माहिती मिळवता येईल. पूर्वी यासाठी महसूल विभागामध्ये जावे लागत असायचे. परंतु, आता ही माहिती तुम्ही एका मिनिटांत घरबसल्या मिळवू शकता. त्याद्वारे तुम्ही भू नक्ष, भुलेख, खातेवहीची प्रत इत्यादी रेकॉर्ड सहज तपासू शकता. कसे ते जाणून घेऊयात.

Brinjal Rate । वांग्याच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या आजचे दर

वापरा ही पद्धत

  • सर्वात अगोदर राज्य महसूल विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
  • पुढे जिल्हा आणि तालुक्याचे नाव निवडा.
  • त्यानंतर ज्या गावच्या जमिनी विषयी माहिती जाणून घ्यायची आहे त्या गावाचे नाव टाका.
  • पुढे तुमच्या समोर जे पर्याय दिसतील त्या पर्यायामधून खातेधारकांचे नाव शोधा हा पर्याय निवडा.
  • जमीन मालकाच्या नावाचे पहिले अक्षर टाकून सर्च करा या बटणावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला जे नाव दिसतील त्यातून तुम्हाला हवे असणाऱ्या जमीन मालकाचे नाव निवडा.
  • पुढे आलेला कॅपचा कोड टाका.
  • कॅपच्या कोड टाकून संबंधित खाते क्रमांक किंवा गट क्रमांक संपूर्ण तपशील तुम्हाला दिसेल.
  • गट क्रमांकापासून त्या जमिनीचा संपूर्णपणे तपशील पाहता येईल. संबंधित खातेधारकाच्या नावावर किती जमीन आहे हे लक्षात येईल.

Electric Bike । भारीच की राव! मालवाहतूक करणारी इलेक्ट्रिक बाईक, किंमतही आहे खूपच कमी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *