Cotton Export । कापूस हे पांढरं सोनं मानलं जातं. विदर्भामध्ये कापसाचं सर्वाधिक उत्पादन घेतलं जातं आणि नंतर मराठवाड्याचा क्रमांक लागतो. कापूस हे खरिपातील महत्त्वाचं पीक आहे. दरम्यान, निसर्गाचा लहरीपणा आणि प्रमाणापेक्षा जास्त पावसामुळे कापसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम होतो. परंतु आता कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत.
कारण तब्बल 18 वर्षानंतर कापसाच्या निर्यातीत कमालीची घसरण (Decline in cotton exports) झाली आहे. देशांतर्गत बाजारपेठेत मालाच्या किंमती वाढल्या आहेत. सप्टेंबर 2022-23 मध्ये कापूस निर्यात 64 टक्क्यांनी घसरू शकतात, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (CAI) ने व्यक्त केला आहे. CAI डेटानुसार सांगायचे झाले तर 2022-23 मध्ये निर्यातीत 15.50 लाख गाठींची घसरण झाली आहे.
Success story । शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग! लिंबाच्या अवघ्या 10 झाडांमधून घेतले लाखोंचे उत्पन्न
जागतिक अर्थव्यवस्थेवर खास करून चीनवर परिणाम झाल्यामुळे कापसाच्या निर्यातीला फटका बसला आहे. व्यापाऱ्यांनाही कापूस निर्यातीला विलंब होत असून यंदा कापसाचे भाव वाढतील, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यावर्षी उत्पादनात वाढ झाल्याने जागतिक बाजारपेठेतही कापसाच्या दरात कमालीची घसरण झाली आहे.
Agriculture News । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! भाजीपाल्याला मिळतोय पन्नास टक्के जास्तीचा भाव