Agriculture News

Agriculture News । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! भाजीपाल्याला मिळतोय पन्नास टक्के जास्तीचा भाव

बातम्या

Agriculture News । आजही अनेकजण तरकारी पिके घेतात. परंतु प्रत्येक वर्षी या पिकांना चांगला बाजारभाव मिळतोच असे नाही. बऱ्याच वेळा त्यांना बाजारभाव न मिळाल्याने पिके रस्त्यांवर फेकून द्यावी लागतात. दोन महिन्यांपूर्वी टोमॅटोने शंभरी पार केली होती. मात्र आता टोमॅटो कवडीमोल भावात विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. अशातच आता भाजीपाल्याला पन्नास टक्के जास्तीचा भाव (Vegetables Price) मिळाला आहे.

Dhananjay Munde । आनंदाची बातमी! ‘या’ पिकाच्या लागवडीसाठी मिळणार हेक्टरी 7 लाखांचं अनुदान

त्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. यामागचे कारण म्हणजे पुण्यातील मांजरी उप बाजार समिती येथील संचालक मंडळांनी खोती आणि दुबार व्यापार विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आता शेतकरी ते ग्राहक अशी थेट विक्री होत आहे. संचालक मंडळांच्या निर्णयानंतर खोती आणि व्यापारी बाजार समितीच्या आवाराच्या बाहेर भाजीपाल्याची विक्री केली जात आहे. (Vegetables Price Hike)

Modern agriculture । इस्रायल शेती तंत्र जगभरात का लोकप्रिय आहे? कशी करतात येथे शेती? जाणून घ्या…

महत्त्वाचे म्हणजे या उपबाजार समितीमध्ये शेतकऱ्यांकडून कुठलीही आडत, तोलाई किंवा कमिशन आकारले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना थेट भाव मिळत आहे, अशी माहिती बाजार समितीच्या संचालक मंडळातील सुदर्शन चौधरी यांनी दिली आहे. पन्नास टक्के जास्तीचा भाव मिळाल्यावर शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे.

Sweet Potato Varieties । ‘या’ आहेत रताळ्याच्या सुधारित जाती, लागवड केल्यास मिळेल प्रचंड नफा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *