Sharad Pawar । सर्व पक्षांनी लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha election) तयारी सुरु केली आहे. काही उमेदवारांची घोषणा झाली आहे तर अजूनही काही उमेदवारांची नावे गुलदस्त्यात आहेत. राजकीय नेते आपापल्या मतदारसंघात सभा घेताना पाहायला मिळत आहेत. आज इंदापूरमध्ये महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी खासदार शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. (Latest marathi news)
मोदी सरकारला शेतकऱ्यांची काळजी नाही
आज बारामती मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने खासदार सुप्रिया सुळेंसाठी (Supriya Sule) प्रचार सभांचे आयोजन केले होते. या पार पडलेल्या प्रचार सभेत शरद पवार म्हणाले की, “सध्या देशात वेगळी स्थिती निर्माण झाली आहे. देशाची सत्ता आणि कारभार एकाच हातात गेली असून या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही,” असा घणाघात शरद पवारांनी केला आहे.
“पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मोदी सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना अनेक आश्वासने दिली. पण या आश्वासनांचा मोदी सरकारला विसर पडला आहे. देशाचा कारभार कोणाच्या हातात जावा, असा प्रश्न सामान्यांना पडला असल्याने आगामी लोकसभा निवडणुका खूप महत्त्वाच्या असणार आहेत. भाजप (BJP) हातात असणाऱ्या सत्तेचा वापर लोकांच्या हितासाठी नसून संविधानावर हल्ला करण्यासाठी केला जातोय,” असा आरोपही शरद पवारांनी केला आहे.
Garlic Price । लसणाचा भाव का आहे चर्चेत? जाणून घ्या सध्या बाजारात किती भाव मिळतोय
“भाजप देशाचे संविधान बदलण्यास निघाले आहे. त्यांचा कर्नाटकातील एक मंत्री संविधान बदलण्यासाठी मतदान करा, असे आवाहन भाजपकडून मतदारांना केले जात आहे. देशातील सर्वसामान्याने आता जागरूक राहायला पाहिजे. संजय राऊत यांना तुरूंगात टाकले होते. अशातच आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तुरुंगात टाकले आहे. पण जनताच केजरीवाल यांच्या मागे आहे,” असेही शरद पवार म्हणाले आहेत.
Crop Insurance । धक्कादायक! शेतकरी पिक विम्याच्या रक्कमेपासून वंचित, संतप्त शेतकरी थेट चढला टॉवरवर