Sheep Died

Sheep Died । शेतातून घरी जाताना घडला मोठा अनर्थ! अचानक 80 मेंढ्यांचा मृत्यू, मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान

बातम्या

Sheep Died । अनेकजण मेंढीपालन (Sheep farming) करतात. हा व्यवसाय कमी जागेत आणि कमी खर्चात करता येतो. इतकेच नाही तर संपूर्ण वर्षभर या व्यवसायाला (Sheep farming business) मागणी असते. त्यामुळे अनेकजण हा व्यवसाय करतात. शिवाय मेंढीच्या लोकरीपासूनही पैसे मिळतात. अशातच आता धक्कादायक बाब समोर आली आहे. शेतातून घरी जाताना एक मोठा अनर्थ घडला आहे.

मेंढपाळाचे लाखोंचे नुकसान

एका शेतकऱ्याच्या शेतात अचानक तब्बल 80 मेंढ्यांचा मृत्यू (80 Sheep Died) झाला आहे. वर्ध्याच्या (Vardha) देवळी तालुक्यातील गिरोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट आले आहे. त्याचे लाखो रुपयांचे नुकसान काही क्षणात झाले आहे. या घटनेमुळे संपूर्ण देवळी तालुक्यात (80 Sheep Died in Vardha) हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, मेंढ्यांच्या मृत्यूचे कारण अजूनही स्पष्ट झाले नाही. परंतु, मेंढ्या शेतात चरत असताना मेंढ्यांनी कपाशीची बोंडे खाल्ली आणि त्यांचा मृत्यू झाला असे सांगण्यात येत आहे. शेतकरी प्रभाकर थुल यांच्या शेतात मेंढ्याचा मृत्यू झाला आहे. आपल्या मेंढ्याना रात्री शेतातून घेऊन जाताना अचानक ही धक्कादायक बाब घडली. अचानक मेंढ्या खाली कोसळू लागल्याने मेंढपाळालाही काही समजत नव्हते.

त्याने तातडीने इतर शेतकऱ्यांना घटनास्थळी बोलवून आणले. मात्र तोपर्यंत अनेक मेंढ्यांचा मृत्यू झाला होता. पशुसंवर्धन विभागाने पंचनामा केला आहे, तसेच त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येणार आहे. मेंढ्यांना विषारी चाऱ्यातून विषबाधा झाली असून त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *