Pm Kisan Yojana । शेतकऱ्यांना सतत वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे राज्य आणि केंद्र सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी योजना आणत असते. ज्याचा त्यांना फायदा होत असतो. दरम्यान, केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम किसान योजनेची सुरुवात केली आहे. याचा देशभरातील करोडो शेतकरी लाभ घेत आहेत. आतापर्यंत या योजनेचे 14 हप्ते जमा झाले आहेत. (Government Scheme)
Success story । शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग! लिंबाच्या अवघ्या 10 झाडांमधून घेतले लाखोंचे उत्पन्न
त्यामुळे शेतकरी 15 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. 14वा हप्ता हा 27 जुलै 2023 रोजी वितरित करण्यात आला आहे. दरम्यान, पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी आणि आधार सीडिंग करणे बंधनकारक केले आहे. आधार लिंक न करणाऱ्या शेतकऱ्यांना यापुढे पीएम किसान योजनेच्या सहा हजार रुपयांच्या यादीतून वगळले जाणार आहे.
Agriculture News । शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी! भाजीपाल्याला मिळतोय पन्नास टक्के जास्तीचा भाव
दरम्यान, सरकारने पाचवेळा मुदत वाढ देऊनही जिल्ह्यातील 21 हजार 193 खातेदारांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यामुळे आता त्यांची नावे बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या शेतकऱ्यांची खाती बनावट समजली जातील. त्यांना पुढच्या हप्त्याचा लाभ मिळणार नाही.
Dhananjay Munde । आनंदाची बातमी! ‘या’ पिकाच्या लागवडीसाठी मिळणार हेक्टरी 7 लाखांचं अनुदान
या दिवशी खात्यात येणार पैसे
मीडिया रिपोर्टनुसार, पीएम किसान या योजनेचा 15वा हप्ता हा दिवाळीच्या दिवशी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, असा दावा केला जात आहे. त्यामुळे सर्वजण या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. जर या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तर शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल, यात काही शंकाच नाही.
Modern agriculture । इस्रायल शेती तंत्र जगभरात का लोकप्रिय आहे? कशी करतात येथे शेती? जाणून घ्या…