Sugarcane Farmer News । भारतात मोठ्या प्रमाणावर उसाचे उत्पन्न घेतले जाते. सध्या उसाचा प्रश्न पेटला आहे. कमी पावसामुळे उसाच्या उत्पादनात घट झाल्याने साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यात आता शेतकरी संघटना ऊस दरावरून आक्रमक झाली आहे. उसाला पाच हजारांचा दर मिळालाच पाहिजे, अशी मागणी शेतकरी संघटना करू लागल्या आहेत.
Cotton Export । अर्रर्र! 18 वर्षानंतर कापसाच्या निर्यातीत घसरण, जाणून घ्या यामागचं कारण
अशातच आता एक धक्कादायक घटना घडली आहे. शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथी अब्दुललाट रस्त्यावरील पाटील मळीजवळ तब्बल ३५ एकरांपेक्षा जास्त क्षेत्रातील ऊस (Sugarcane Farmer) अचानक लागलेल्या आगीत जळून खाक झाला आहे. या आगीमध्ये शेतकऱ्याचे ५० लाखांचे नुकसान झाले आहे. क्षणात होत्याचे नव्हते झाल्याने या शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.
परंतु अजूनही आगीचे खरे कारण समोर आले नाही, ही आग शॉर्टसर्किटने लागली असावी असा अंदाज शेतकरी व्यक्त करत आहेत. काल दुपारी तीनच्या अंदाजे ३५ एकरांवरील ऊस शेतीला दरम्यान आग लागली. बघता बघता आग पसरत गेली. त्यात आग लागलेल्या शेतात जाण्यासाठी पायवाट रस्ता असल्याने अग्निशामक वाहन त्या ठिकाणी जाण्यासाठी समस्या निर्माण झाली त्यामुळे बराच वेळ आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावे लागले.
Success story । शेतकऱ्याचा भन्नाट प्रयोग! लिंबाच्या अवघ्या 10 झाडांमधून घेतले लाखोंचे उत्पन्न