Farmer Success Story

Farmer Success Story । दौंडच्या शेतकऱ्याची कमाल, ऊस शेतीला बगल देत फुलवली शेवंतीची बाग, जाणून घ्या नियोजन

यशोगाथा

Farmer Success Story । नैसर्गिक तसेच मानवनिर्मित समस्यांवर मात करत शेतकऱ्यांना शेती करावी लागते. जर तुम्हाला शेतीतून जास्त उत्पन्न मिळवायचे असेल तर तुम्हाला मेहनत आणि मनात जिद्द असावी लागते. (Success Story) हल्ली शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोग करू लागले आहेत. ज्याचा त्यांच्या उत्पन्नावर परिणाम होत आहे. अनेक शेतकरी फुलांची शेती (Flower farming) करत आहेत.

Success Story । मेहनतीच्या जोरावर दोन भावांनी केली शेततळ्यात शिंपल्यांची शेती, असं केलं नियोजन

बंगलोर येथून आणली ३६००० रोपे

अनेक शेतकरी मुबलक प्रमाणात पाणी असेल तर उसाची लागवड (Cultivation of sugarcane) करतात. कारण उसाची शेती जास्त उत्पन्न मिळवून देते. पण दौंडमधील एका शेतकऱ्याने चक्क ऊस शेती थांबवत शेवंतीची शेती (Shewanti Flower Farming) केली आहे. शेखर मोरे (Shekhar More) असे या युवा शेतकऱ्याचे नाव आहे. लागवडीसाठी त्यांनी बंगलोर येथून ३६००० रोपे विकत आणली. मित्राच्या सल्ल्याने त्यांनी यशस्वी शेती केली.

ild Animal । जंगली प्राण्यांमुळे पिकांची नासाडी होतेय? गोमुत्राचा असा करा वापर

असे केले नियोजन

लागवडीसाठी मोरे यांनी सर्वात अगोदर पाण्याचा निचरा असणारी जमीन निवडून श्रावण महिन्यात लागवड केली. या दिवसात जास्त पाणी असल्याने उंच बेड करावे लागतात. छोटे बेड केले तर पाणी साचून याचा फटका कोवळ्या रोपांना बसू शकतो. या फुलशेतीला कमी पाण्याची गरज असते. त्यासाठी त्यांनी ठिबक सिंचन देखील केले आहे.

Havaman Andaj | महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; जाणून घ्या कुठे कोसळणार पाऊस?

फुल विक्रीसाठी त्यांनी मुंबई बाजारपेठ निवडल असून समजा येथे फुलांची जास्त आवक झाली तर देखील मार्केट ऐवढे पडत नाही. त्यांना सरासरी १२० ते १४० रुपये किलो मागे दर मिळाला. ते शेवंतीच्या फुलांचा तोडा शनिवार ते बुधवार या दरम्यान करतात.

Sheep-Goat Disease । तुमच्या शेळ्या-मेंढ्या शेतात, डोंगरावर चरण्यासाठी जातात का? तर लक्ष ठेवा नाहीतर होईल हा गंभीर आजार

दरम्यान, मोरे हे आपल्या परिवारासह शेवंती फुलशेतीचे व्यवस्थापन करतात. मोरे यांना शेवंतीच्या लागवड करताना खत व्यवस्थापन व कीड नियंत्रण यासाठी वाखारी वाकडा पूल येथील बालाजी कृषी सेवा केंद्राचे संचालक राहुल देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. यापूर्वी मोरे यांनी उसाची शेती अनेकवेळा केली. पण सध्या त्यांनी प्रयोग म्हणून शेवंती हे पीक निवडले.

Solar Yojana । प्रधानमंत्री सूर्योदय योजना 2024 काय आहे? नोंदणी प्रक्रिया, पात्रता आणि फायदे, जाणून घ्या सर्व माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *