Government schemes । शेतकऱ्यांना विविध संकटांचा सामना करावा लागल्याने साहजिकच त्यांच्यावर आर्थिक संकट येते, अनेक शेतकरी हतबल होऊन टोकाचा निर्णय घेतात. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या कुटुंबावर देखील उपासमारीची वेळ येते. शेतकऱ्यांची हीच समस्या लक्षात घेऊन सरकार विविध योजनांना (Schemes for farmer) सुरुवात करत असते.
मागेल त्याला मिळते शेततळे
सरकारची यापैकी एक योजना म्हणजे ‘मागेल त्याला मिळते शेततळे’ योजना (Pond scheme) होय. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना शेततळ्यासाठी अर्ज करता येतो. दरम्यान, शेततळ्याला अनुदान मिळण्यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करता येईल. राज्यातील २३ हजार ५२४ शेततळ्यांना तालुकास्तरावर तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पूर्व संमती दिली आहे.
Success Story । मेहनतीच्या जोरावर दोन भावांनी केली शेततळ्यात शिंपल्यांची शेती, असं केलं नियोजन
यापैकी ६ हजार ७२ शेततळी पूर्ण झाली आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यामध्ये यासाठी ४१ कोटी ६० लाख रुपये देखील अनुदान जमा करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी योजना राज्यातील शेतकऱ्यांना निर्माण होणाऱ्या अडचणींतून येणारे नैराश्य दूर करण्याच्या उद्देशाने कृषी विभागामार्फत महाडीबीटी पोर्टलद्वारे मिळणारे विविध घटकांचे लाभ मागणी केल्यावर तातडीने उपलब्ध करुन दिले जातात.
Wild Animal । जंगली प्राण्यांमुळे पिकांची नासाडी होतेय? गोमुत्राचा असा करा वापर
या ठिकाणी करा अर्ज
जर तुम्हालादेखील शेततळ्यासाठी अर्ज करायचा असेल तर, त्यांनी महाडीबीटी पोर्टलवर तातडीने अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आला आहे. या योजनेअंतर्गत विविध आकारमानाच्या शेततळयापैकी कोणत्याही एका शेततळ्याकरता महाडिबीटी पोर्टलवर अर्ज करता येईल.
Havaman Andaj | महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; जाणून घ्या कुठे कोसळणार पाऊस?
पात्रता
- शेतकऱ्याकडे उपसा करून शेततळी भरली जात असल्याने स्वत:ची विहीर / बोअर असणे, विजेची उपलब्धता आणि अधिकृत जोडणी असावी.
- शेततळय़ाखाली जाणारी जमीन (किमान २२५ व कमाल ९०० चौरस मीटर) इतकी असते.
- शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी ०.६ हेक्टर (म्हणजे ६०,०० चौरस मीटर) जमीन हवी.
- उपसा करण्यासाठी यंत्र आणि शेतावरील पाणी वापरासाठी पाइपलाइन, ठिबक / तुषार सिंचन असावे.
आवश्यक कागदपत्रे
- 7/12 उतारा
- जमिनीच्या जात प्रमाणपत्राची प्रत
- आत्महत्याग्रस्त कुटुंबाचा वारस
- दारिद्र्यरेषेखालील पुरावा
- आधार कार्ड 8A प्रमाणपत्र