Animal Care

Animal Care । जनावरांना सर्पदंश झालाय? घाबरू नका अशाप्रकारे करा प्रथमोपचार

पशुसंवर्धन

Animal Care । भारतात मोठ्या प्रमाणावर शेतीसोबत पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) केला जातो. या व्यवसायामुळे (Animal husbandry ) शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक हातभार लागतो. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होते. अनेक शेतकरी जनावरे चरण्यासाठी मोकळी सोडून देतात. पण असे करणे जनावरांच्या आरोग्याच्या दृष्टीने खुह्प हानिकारक आहे. कारण अशावेळी जनावरांना सर्पदंश होण्याची जास्त शक्यता आहे.

Government Schemes । तुम्हालाही शेततळं हवंय? तातडीने करा ‘या’ ठिकाणी अर्ज

जर तुम्ही याकडे वेळीच लक्ष किंवा उपाय केला नाही तर संबंधित जनावर दगावण्याची शक्यता असते. सर्पदंश झाल्यावर तातडीने जनावरांना प्रथमोपचार मिळणे खूप गरजेचे आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांना वेळेत प्रथमोपचार दिल्याने जनावरांचे प्राण वाचले आहेत. जर जनावरांना नागदंश, (Snake bites to animals) मण्यार दंश झाला तर मज्जासंस्था बाधित होऊन अर्धांगवायू सदृश लक्षणे दिसतात. (Animal Care tips)

Farmer Success Story । दौंडच्या शेतकऱ्याची कमाल, ऊस शेतीला बगल देत फुलवली शेवंतीची बाग, जाणून घ्या नियोजन

मण्यार

  • मण्यारमध्ये मज्जासंस्था आणि रक्ताशी निगडित अवयवांना इजा करणारे विष असते.
  • जर जनावरांना वेळेवर उपचार मिळाला नाही तर श्‍वसनसंस्थेचा अर्धांगवायू होऊन जनावरे दगावतात.
  • दंश झालेल्या ठिकाणी मोठी सूज येऊन श्‍वसनाचा वेग वाढतो. तसेच दंश केलेल्या जागी रक्तस्राव होतो, हृदयाचे ठोके वाढतात, ताप येणे, अशक्तपणा येणे अशी लक्षणे दिसतात.

Success Story । मेहनतीच्या जोरावर दोन भावांनी केली शेततळ्यात शिंपल्यांची शेती, असं केलं नियोजन

फुरसे, घोणस

  • या प्रजातींमध्ये रक्त गोठवणे थांबविणारे, रक्तातील लाल पेशींना इजा करणारे आणि रक्तस्राव करणारे घातक विषारी घटक असतात.
  • बाधित जनावराच्या शरीरावर ज्या ठिकाणी दंश केला आहे, तिथे रक्तस्राव होणे, पायावर दंश झाला तर सूज मोठ्या प्रमाणात वरच्या दिशेने चढत जाणे, वेदना होणे, अस्वस्थ वाटणे, चालताना लंगडणे आणि जनावरांचे खाणे-पिणे मंदावते.
    -दंश तोंडाच्या भागामध्ये झाला असेल तर तोंडावर जास्त प्रमाणात सूज येते. ती खालच्या बाजूस असेल तर श्‍वसनास त्रास होतो. योग्य उपचार मिळाला नाही तर जनावर दगावते.

नाग

  • या प्रजातींमध्ये मेंदू आणि हृदय या अवयवांना इजा करणारे घातक विष असते.
  • दंश झाल्यानंतर बाधित जनावरांमध्ये दंश झालेल्या जागेवर सूज येऊन तोंडातून लाळ गळते. अर्धांगवायूसदृश लक्षणे दिसून जनावराचा तोल जातो.
  • वेळेत उपचार मिळाला नाही तर जनावरे श्‍वसनसंस्थेच्या अर्धांगवायूने मृत्यू पावतात.

Havaman Andaj | महाराष्ट्रात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज; जाणून घ्या कुठे कोसळणार पाऊस?

करा या उपाययोजना

  • जनावरांना सर्पदंशाचे निदान झाले तर दंश झालेल्या ठिकाणी रक्तस्राव, सूज येणे अशी लक्षणे अर्ध्या तासात दिसून अली तर तातडीने पशुवैद्यकाकडून योग्य औषधोपचार करावेत.
  • आकार, लांबी व रंगावरून सर्वसाधारणपणे सापाचा प्रकार ओळखावा.
  • सर्पदंश झाला तर जनावरास पायावर किंवा तोंडावर सूज येण्यास सुरुवात होणे किंवा दंश झालेल्या ठिकाणी चाव्याची खूण, रक्तस्राव दिसणे अशी लक्षणे दिसली तर तत्काळ पशुवैद्यकांची मदत घ्यावी.
  • उपरोक्त नमूद प्रसंग घडूनही जनावरांत कोणतेही लक्षण न दिसल्यास फक्त निरीक्षणाखाली ठेवा.

Wild Animal । जंगली प्राण्यांमुळे पिकांची नासाडी होतेय? गोमुत्राचा असा करा वापर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *