Unseasonal Rain

Unseasonal Rain । सर्वात मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता

हवामान

Unseasonal Rain । देशभरातील थरथरणारी थंडी काही कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. भारतातील विविध राज्यांमध्ये हवामानाचा तिहेरी हल्ला होत आहे. सध्याच्या ऋतुचक्रावर कोणाचाही विश्वास नाहीये. पाऊस (Rain in Maharashtra) कधीही बरसत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. महिन्याच्या सुरुवातीला पावसाने राज्याच्या काही भागात हजेरी लावली होती. (Rain update)

Chemical Pesticides । शेतकरी बंधुनो, कीटकनाशकांची फवारणी करण्यापूर्वी हे जाणून घ्याच; नाहीतर होईल मोठं नुकसान

पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी

अशातच आता पुन्हा एकदा राज्याला अवकाळी पावसाचा तडाखा बसणार आहे. यामुळे पिकांचे पुन्हा एकदा नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हवामान खात्याने पिकांची काळजी घेण्याचे आवाहन (IMD Alert) शेतकऱ्यांना केले आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. येथे मागील दोन दिवसांपासून ढगाळ हवामान होते. (Unseasonal Rain in Maharashtra)

Dairy Industry । दूध व्यवसायामुळे लागला संसाराला आर्थिक हातभार, कसं केलं नियोजन? जाणून घ्या..

अशातच आज सकाळी येथे पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे गहू आणि हरभरा या पिकांना फटका बसू शकतो. पण जिल्ह्यात सध्या रब्बी हंगामाच्या भात पिकाची लागवड सुरू असून या पिकाला या पावसाचा फायदा होईल. तसेच आज मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पाऊस पडेल, अशी शक्यता हवामान खात्याकडून (IMD Update) वर्तवली आहे.

Madhura Jwari । ऐकावं ते नवलच! आता ज्वारीपासून तयार होणार गूळ आणि काकवी, जाणून घ्या ‘मधुरा-1’ वाणाची खास वैशिष्ट्ये

विदर्भातील गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर व अमरावती जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. दरम्यान, धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या बागेवर मोठे परिणाम होत आहेत. फवारणीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च देखील होत आहे. अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणाचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे.

Fish Food । तांदूळ माशांना खायला देता येते का? जाणून घ्या माशांच्या अन्नाबद्दल सविस्तर माहिती

द्राक्षाच्या दरात घसरण अन् फवारणीचा खर्च वाढला

द्राक्षाची निर्यातीसाठी होणारी पॅकिंग देखील बंद पडली आहे. १२० ते १४० रूपयांचे असणारे दर खूप कमी झाल्याचे पाहायला मिळत आहेत. अचानक पडलेल्या दरामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी पुण्यात येऊन द्राक्षाची थेट ग्राहकांना विक्री करत आहेत. जर हे चित्र असेच राहिले तर शेतकऱ्यांवर आणखी वाईट वेळ येऊ शकते, हे नक्कीच.

Farmer Brittney Woods । हिरोईनसारखी दिसणारी ‘ही’ मॉडेल करते शेती, दूध काढण्यापासून ते ट्रॅक्टर चालवण्यापर्यंत करते सर्व कामे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *