Havaman Andaj

Havaman Andaj । राज्यात पावसाची पुन्हा हजेरी! येत्या 24 तासांत ‘या’ ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस

हवामान

Havaman Andaj । निम्मा ऑक्टोबर महिना संपत आला आहे. काही राज्यांमध्ये लोकांना दिवसा उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या परतीच्या पावसाचा प्रवास सुरु झाला आहे. परंतु यावर्षी देशासह राज्याला पावसाने चांगलीच ओढ दिली आहे. राज्याच्या अनेक भागात अपेक्षित पाऊस पडला नाही. धरणाच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. अशातच हवामान खात्याने पावसाबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

Success story । जिद्द असावी तर अशी! कोरोनामुळे नोकरी गमावली, अपंग तरुणाने केळीतून केली लाखोंची कमाई

मागील दोन दिवसांपासून देशातील काही राज्यांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, मेघालयसह सिक्कीमध्ये मुसळधार पाऊस झाला आहे. महत्त्वाचे म्हणजे आता हवामान खात्याने (IMD Alert) येत्या 24 तासांत या भागात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी पावसाचा अंदाज घेऊन बाहेर पडावे. (Rain Update)

Sugarcane Farmer News । धक्कादायक! शॉर्ट सर्किटने ३५ एकर उसाची राखरांगोळी, झाले ५० लाखांचे नुकसान

हवामान खात्याच्या माहितीनुसार, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये तेलंगणा, कर्नाटकचा आणखी काही भाग, महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्राच्या उरलेल्या भागातून मान्सून परतणार आहे. तसेच लवकरच झारखंड, बिहार, पश्चिम बंगाल, छत्तीसगड आणि ओडिशाच्या काही भागांतून मान्सून माघारी जाऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आता उन्हाचे चटके सहन करावे लागू शकतील.

Cotton Export । अर्रर्र! 18 वर्षानंतर कापसाच्या निर्यातीत घसरण, जाणून घ्या यामागचं कारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *