Agriculture News

Agriculture News । शेतकऱ्यांना देखील भरावा लागतो आयकर, काय सांगतो कायदा? जाणून घ्या

बातम्या

Agriculture News । देशात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. काही जण पारंपरिक पद्धतीने शेती करतात तर काहीजण आधुनिक पद्धतीने शेती करतात. शेतीत योग्य नियोजन आणि मेहनत केली तर त्याचा खूप फायदा होतो. महत्त्वाचे म्हणजे अनेकदा शेतकऱ्यांच्या पिकांना योग्य तो बाजारभाव मिळत नाही. अशावेळी त्यांच्यावर आर्थिक संकट येते. काहीजण बाजारभाव नसल्याने टोकाचा निर्णय घेतात.

Havaman Andaj । राज्यात पावसाची पुन्हा हजेरी! येत्या 24 तासांत ‘या’ ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस

अनेकजण शेतीसोबत व्यवसाय करतात. यात मोठ्या प्रमाणावर पशुपालन केले जाते. शेती व्यवसायातून मिळालेल्या उत्पन्नावर कर आकारला जातो का? अशा प्रश्न अनेकांना पडतो. (Income Tax for Farmer) आयकर कायद्यानुसार भारतातील शेतकऱ्यांना शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा आयकर भरावा लागत नाही. याबाबत प्राप्तिकर कायदा 1961 मध्ये तरतूद केली आहे.

Success story । जिद्द असावी तर अशी! कोरोनामुळे नोकरी गमावली, अपंग तरुणाने केळीतून केली लाखोंची कमाई

..तर भरावा लागतो कर

कलम 10 (1) नुसार, शेतीतून मिळणारे सर्व प्रकारचे उत्पन्न करमुक्त असून काही परिस्थितीत शेतकऱ्यांना कर भरावा लागू शकतो. नियमानुसार समजा शेतकऱ्यांनी शेतमालावर प्रक्रिया करून बाय प्रॉडक्ट तयार करून त्याच्या विक्रीतून उत्पन्न घेतले तर अशा उत्पन्नावर कर भरावा लागतो.

Sugarcane Farmer News । धक्कादायक! शॉर्ट सर्किटने ३५ एकर उसाची राखरांगोळी, झाले ५० लाखांचे नुकसान

थोडक्यात सांगायचे झाले तर शेतमालावर प्रक्रिया केल्यानंतर तयार केलेलं प्रॉडक्ट शेतीचे उत्पन्न म्हणून गृहीत धरत नाही. एखाद्या शेतकऱ्याने उसाचे उत्पादन घेऊन जर ऊस कारखान्याला न देता स्वतः गुळ किंवा साखर तयार केल्यास असे उत्पादन शेतीचे उत्पादन गृहीत धरत नाही. हे व्यवसायिक उत्पादन गृहीत धरून कर आकारला जातो.

Cotton Export । अर्रर्र! 18 वर्षानंतर कापसाच्या निर्यातीत घसरण, जाणून घ्या यामागचं कारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *