Matru Vandana Yojana 2

Matru Vandana Yojana 2 । दुसरे कन्यारत्न प्राप्त झाल्यास मिळणार पैसे, काय आहे योजना? जाणून घ्या

शासकीय योजना

Matru Vandana Yojana 2 । सर्वसामान्यांच्या हितासाठी केंद्र आणि राज्य सरकार सतत वेगवेगळ्या योजना राबवत असते. देशभरातील कोट्यवधी लोक या योजनांचा लाभ घेतात. महत्त्वाचे म्हणजे सरकार महिलांच्या सक्षमिकरणासाठी अनेक योजना (Government Scheme) राबवत असते. अशातच आता सरकारने मुलींसाठी एक योजना आणली आहे. त्याअंतर्गत त्यांना पैसे मिळणार आहेत. काय आहे योजना? जाणून घ्या सविस्तर माहिती.

Agriculture News । शेतकऱ्यांना देखील भरावा लागतो आयकर, काय सांगतो कायदा? जाणून घ्या

सार्वजनिक आरोग्य विभागाने एक योजना सुरु केली केली आहे. त्यानुसार जर महिलेला दुसरे आपत्य मुलगी झाली तर तिला 6 हजार रुपये देण्यात येणार आहेत. दरम्यान, सरकारमार्फत पहिल्या आपत्यासाठी 5 हजार रुपये देण्यात येतात. अशात आता पंतप्रधान मातृवंदना योजना 2 जाहीर केली आहे. त्याअंतर्गत दुसरे कन्यारत्न प्राप्त झाले तर मुलीच्या कुटुंबाला पैसे मिळणार आहेत.

Havaman Andaj । राज्यात पावसाची पुन्हा हजेरी! येत्या 24 तासांत ‘या’ ठिकाणी पडणार मुसळधार पाऊस

पात्रता

तुम्ही आर्थिक उत्पन्नानुसार योजनेचा लाभ घेऊ शकता. योजनेचा लाभ घेण्यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखांपेक्षा कमी असावे. 18 ते 55 वयोगटातील महिलांना योजनेचा लाभ घेता येईल. समजा एखाद्या महिलेला दोन जुळ्या मुली झाल्या किंवा जुळ्या मुलांमध्ये एक मुलगा आणि मुलगी झाली तर एका मुलीसाठी पैसे महिलेला मिळणार आहेत.

Success story । जिद्द असावी तर अशी! कोरोनामुळे नोकरी गमावली, अपंग तरुणाने केळीतून केली लाखोंची कमाई

असा करा अर्ज

या योजनेचा लाभ घ्यायचा असल्यास तुम्हाला wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. या ठिकाणी दिलेला फॉर्म भरून संबंधित कागदपत्रे जोडून योजनेसाठी तुम्ही अर्ज करू शकता.

Sugarcane Farmer News । धक्कादायक! शॉर्ट सर्किटने ३५ एकर उसाची राखरांगोळी, झाले ५० लाखांचे नुकसान

आवश्यक कागदपत्रे

  • गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत 150 दिवसांच्या आत नोंद
  • लसीकरण प्रमाणपत्र
  • बाळाचा जन्म नोंदणी दाखला
  • लाभार्थी आणि पतीचे आधारकार्ड
  • बँक खाते
  • अटींची पूर्तता केल्या एका महिन्याच्या आत रक्कम मिळते.

Cotton Export । अर्रर्र! 18 वर्षानंतर कापसाच्या निर्यातीत घसरण, जाणून घ्या यामागचं कारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *