Havaman Andaj । भारतातील अनेक राज्यांमधून मान्सूनने माघार घेतली आहे. मात्र वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, 15 ऑक्टोबरपर्यंत दक्षिण आणि उत्तर-पश्चिम भारतातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 13 ते 15 ऑक्टोबर दरम्यान काश्मीर, गिलगिट-बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे
Agriculture News । नुकसानग्रस्तांना मिळाला दिलासा! सरकारकडून मिळाले तब्बल 154 कोटी
नैऋत्य मोसमी पावसाच्या माघारीबद्दल, IMD ने म्हटले आहे की, “बिहार, झारखंड, छत्तीसगडच्या आणखी काही भागांतून नैऋत्य मान्सून माघारीसाठी परिस्थिती अनुकूल आहे. “पुढील 2-3 दिवसांत, कर्नाटकच्या आणखी काही भागात आणि तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य अरबी समुद्राच्या उर्वरित भागात पाऊस पडू शकतो.”
Agriculture News । शेतकऱ्यांना देखील भरावा लागतो आयकर, काय सांगतो कायदा? जाणून घ्या
बिहार, बंगालसह या राज्यांमध्ये पाऊस!
IMD नुसार, नैऋत्य मान्सून बिहार, झारखंड, छत्तीसगडचा काही भाग, गंगेचा पश्चिम बंगाल आणि ओडिशाचा काही भाग, कर्नाटकचा काही भाग आणि तेलंगणा, महाराष्ट्र आणि मध्य अरबच्या उर्वरित भागांतून पुढील 2 दिवसांत माघार घेईल.
Matru Vandana Yojana 2 । दुसरे कन्यारत्न प्राप्त झाल्यास मिळणार पैसे, काय आहे योजना? जाणून घ्या
पुढील ५ दिवस हवामानाचा अंदाज
दक्षिण भारतात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. केरळमध्ये 11 ते 13 ऑक्टोबर, तामिळनाडूमध्ये 11 आणि 12 ऑक्टोबर आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात 11 ऑक्टोबर रोजी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उत्तर-पश्चिम भारतात 13 ते 17 ऑक्टोबर दरम्यान जम्मू-काश्मीर-गिलगिट-बाल्टिस्तान-मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये 14 ते 17 ऑक्टोबरपर्यंत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. 15 ते 17 ऑक्टोबर या कालावधीत उत्तराखंड, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे.
Namo Shetkari Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता