Agriculture News

Agriculture News । नुकसानग्रस्तांना मिळाला दिलासा! सरकारकडून मिळाले तब्बल 154 कोटी

बातम्या

Agriculture News । कधी शेतमालाला हमीभाव नसणे तर कधी अवकाळी पाऊस आणि महापूर यांसारख्या संकटांचा सामना शेतकऱ्यांना सतत करावा लागतो. त्यामुळे शेतकरी निराश तर होतोच शिवाय त्यांच्यावर आर्थिक संकटही येते. यंदा राज्याच्या अनेक भागात पावसाने (Heavy Rain) चांगला धुमाकूळ घातला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. त्यामुळे शेतकरी नुकसानभरपाईची मागणी करत होते. मागील वर्षीही शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले होते.

Namo Shetkari Yojana । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ दिवशी मिळणार नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता

आता याच संदर्भात शेतकऱ्यांना दिलासा देणारी एक बातमी आहे. परभणी जिल्ह्याला मागील वर्षी चांगलेच झोडपून काढले होते. परंतु अजूनही त्याची मदत मिळू शकली नाही. आता या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 3 लाख 90 हजार 758 नुकसानभरपाई मिळणार आहे. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर हेक्टरी 8 हजार 500 रुपये या दराने 154 कोटी 48 लक्ष 7 हजार 680 रुपये रविवारपर्यंत जमा होईल. याबाबत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी आदेश दिले आहेत.

Matru Vandana Yojana 2 । दुसरे कन्यारत्न प्राप्त झाल्यास मिळणार पैसे, काय आहे योजना? जाणून घ्या

दरम्यान, सर्व पात्र बाधित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी परभणी जिल्ह्यातील तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी आणि गट विकास अधिकारी यांनी विशेष मोहीम राबवावी असे आदेश रघुनाथ गावडे यांनी आदेश दिले आहे. याचाअहवाल 15 ऑक्टोबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करावा. तसेच कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असे रघुनाथ गावडे यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

Agriculture News । शेतकऱ्यांना देखील भरावा लागतो आयकर, काय सांगतो कायदा? जाणून घ्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *