Raju Shetti

Raju Shetti । साखरेचे एकही पोते कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही; राजू शेट्टी यांचा गंभीर इशारा

बातम्या

Raju Shetti । शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी कायमच शेतकऱ्यांसोबत खंबीरपणे उभा राहतात. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी राजू शेट्टी आंदोलने देखील करतात. दरम्यान सध्या देखील राजू शेट्टी यांनी एक गंभीर इशारा दिला आहे. गेल्यावर्षीच्या उसाच्या प्रतिटन ४०० रुपयांसाठी आजपासून साखरेचे एक पोते देखील कारखान्याबाहेर जाऊ देणार नाही. त्याचबरोबर एखादा ट्रक, टेम्पो जर कार्यकर्त्यांनी अडवला तर याला संघटना जबाबदार राहणार नाही असा गंभीर इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेमध्ये बोलताना राजू शेट्टी यांनी हा इशारा दिला आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! पुढील 48 तासांसाठी राज्याच्या ‘या’ ठिकाणी ‘मौसम मस्ताना’; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी म्हणाले, गेल्या गळीत हंगामातील प्रति टन 400 रुपये मिळावेत आणि त्याचबरोबर यंदाच्या गळीत हंगामातील दिशा ठरण्यासाठी मंगळवारपासून (ता. १७) कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यावर ‘आत्मक्लेश यात्रा’ काढली जाणार असल्याची माहिती त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

Soybean Rate । सोयाबीनला आज किती दर मिळाला? जाणून घ्या एका क्लिकवर

राजू शेट्टी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 दिवस ही यात्रा काढली जाणार आहे. म्हणजेच 17 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर अशी ही यात्रा असणार आहे. यावेळी जयसिंगपूर या ठिकाणी या दिवशी 22 वी ऊस परिषद घेतली जाणार आहे. साखर कारखान्यांना चारशे रुपये देणे शक्य आहे त्यामुळे स्वाभिमानीची मागणी चुकीची नसल्याचे देखील राजू शेट्टी यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Havaman Andaj । सावधान! राज्यातील 15 जिल्ह्यांना आज येलो अलर्ट; उद्या कशी असेल पावसाची स्थिती?

याबाबत बोलताना राजू शेट्टी पुढे म्हणाले, जनाची नाही तर मनाची लाज वाटून कारखानदार ४०० रुपयांचा दुसरा हप्ता देतील. दरम्यान, महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सर्वच साखर कारखान्यांवर ढोल बजावून त्यांना जाग करण्याचे काम केले आहे.

Onion Rate । बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीत आज कांद्याला मिळाला ‘इतका’ दर; जाणून घ्या एका क्लिकवर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *