Havaman Andaj

Havaman Andaj । सावधान! राज्यातील 15 जिल्ह्यांना आज येलो अलर्ट; उद्या कशी असेल पावसाची स्थिती?

हवामान

Havaman Andaj । मागच्या काही दिवसापासून राज्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र सध्या पावसाचा जोर कमी होत असल्याचे दिसत आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये हलक्या सरी कोसळत आहे तर काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होत आहे. दरम्यान आज मध्य महाराष्ट्रातील, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यासह सातारा, सांगली तर मराठवाड्यामधील लातूर, नांदेड, धाराशिव या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा हवामान विभागाने वर्तविला आहे.

Milk Rate । मोठी बातमी! ‘गोकुळ’ने केली म्हशीच्या दूध दरात दीड रुपयांची वाढ

त्याचबरोबर विदर्भामधील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील तुरळ ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर उर्वरित राज्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात उद्यापासून म्हणजेच मंगळवारपासून पावसाचा जोर कमी होणार असल्याचे देखील हवामान विभागाने सांगितले आहे.

Agriculture News । शेततळ्याचे प्रकार किती? जागेची निवड कशी करावी? फायदे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला असून पुढील दोन दिवसात पश्चिम आणि मध्य भारताच्या आणखी काही भागातून मान्सून परतण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. सध्या काही शेतकऱ्यांचा सोयाबीन काढणीसाठी आलेला आहे तर कापूस देखील वेचणीसाठी आलेला आहे मात्र पावसामुळे शेतकऱ्यांची ही कामे रखडली होती मात्र आता शेतकऱ्यांची ही कामे लवकरच पूर्ण होणार आहेत.

Viral Video । ऐकावं ते नवलच! संपूर्ण गावाने रेड्याचा वाढदिवस साजरा केला मोठ्या जल्लोषात

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *