Viral video

Viral Video । ऐकावं ते नवलच! संपूर्ण गावाने रेड्याचा वाढदिवस साजरा केला मोठ्या जल्लोषात

बातम्या

Viral Video । लोक कधी काय करतील याचा काहीच भरोसा नाही. सोशल मीडियावर आपण दररोज वेगवेगळे व्हिडिओ, मीम, फोटो आणि इतर गोष्टी पाहत असतो. सध्या देखील सोशल मीडियावर एका अनोख्या वाढदिवसाची चर्चा रंगली आहे. हा वाढदिवस एका रेड्याचा असून या रेड्याचं नाव टीट्या आहे. या रेड्याचा वाढदिवस संपूर्ण गावाने साजरा केला आहे, त्यामुळे सगळीकडे याची चर्चा होताना दिसत आहे.

Crop insurance । खुशखबर! पहिल्या टप्प्यात सव्वाकोटी शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा

एखाद्या राजकीय नेत्याच्या वाढदिवसाप्रमाणे संपूर्ण गावाने रेड्याचा वाढदिवशी जल्लोष केला आहे. भिवंडीत रेड्याच्या बर्थडेचे जंगी सेलिब्रेशन करण्यात आली आल्याची माहिती समोर आली आहे. भिवंडी तालुक्यामधील लाखीवली गावामध्ये राहणारे तांडले यांचा हा रेडा असून त्याचा तिसरा वाढदिवस त्यांनी धुमधडाक्यात साजरा केला आहे.

Havaman Andaj । मोठी बातमी! राज्यातून पाऊस परतताना कोसळणार मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट जारी, वाचा हवामान विभागाचा अंदाज

हा रेडा झुंज घेण्यात पटाईत असून त्याने आतापर्यंत झुंजी खेळून अनेक पुरस्कार जिंकले आहेत. त्याचबरोबर प्रसिद्धी देखील मिळाली आहे. त्यामुळे तो सर्वांचा लाडका असून कुटुंबीयांनी त्याचा मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा केला आहे.

Onion Rate । कांद्याला आज सर्वात जास्तीचा किती दर मिळाला? पाहा बाजारातील स्थिती

या कुटुंबीयांनी त्याच्या वाढदिवशी म्हणजेच 28 सप्टेंबर रोजी त्याला सजवल आणि वेगवेगळ्या पदार्थांचे खास केक देखील तयार केले आहेत. संपूर्ण गावाला जंगी पार्टी देण्यात आली आणि रात्री फटाके देखील वाजवण्यात आले असा जंगी वाढदिवस त्याचा साजरा करत करण्यात आला आहे. याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Desi Jugad । जुन्या वस्तूंपासून शेतकऱ्याने बनवला भन्नाट ट्रॅक्टर; १ लिटर डिझेलमध्ये १० गुंठे शेत नागंरणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *