Desi Jugad । असं म्हणतात की काहीतरी नवीन करण्याची आवड, भावना आणि काहीतरी वेगळं करण्याची इच्छा असणारेच करतात, मग त्यांना कोणीही रोखू शकत नाही. सध्या एकच एक उदाहरण आपण पाहणार आहोत. बिहारमधील एका शेतकऱ्याची परिस्थिती हलाखीची होती. ट्रॅक्टर घेण्याइतके पैसे त्याच्याकडे नव्हते पण शेतीच्या आवडीमुळे त्याला अशी भन्नाट कल्पना सुचली की सर्वजण थक्कच झाले.
बिहारच्या या शेतकऱ्याने जुगाड वापरून असा ट्रॅक्टर बनवला की मोठमोठे इंजिनीअरही त्याचे चाहते बनले आणि त्याच्या जुगाडने सगळ्यांना विचार करायला भाग पाडले की माणूस जे काही मिळवतो, ते आपल्या बुद्धीच्या बळावर आणि खऱ्या मेहनतीने मिळवू शकतो.
Crop insurance । खुशखबर! पहिल्या टप्प्यात सव्वाकोटी शेतकऱ्यांना मिळणार पीकविमा
नेमकं काय केलं बिहारच्या शेतकऱ्याने?
बिहारमधील एका शेतकऱ्याने असा ट्रॅक्टर बनवला की सगळ्यांनाच धक्का बसला. बिहारमधील शेतकऱ्याने जुगाडू ट्रॅक्टर बनवला आहे. शेतकऱ्याने भंगारमधील वस्तूपासून ट्रॅक्टर बनवला आणि पंपिंग सेटचे इंजिन घरीच पडून होते. या जुगाडू शेतकऱ्याचे नाव विनोद असून त्याचे वय ५० वर्षे आहे. तो बिहारमधील सिवान जिल्ह्यातील रहिवासी आहे. पैशाअभावी विनोदने जुगाड तंत्रज्ञानाचा वापर करून ट्रॅक्टर बनवला.
Onion Rate । कांद्याला आज सर्वात जास्तीचा किती दर मिळाला? पाहा बाजारातील स्थिती
शेतकऱ्याने 350 HP चा ट्रॅक्टर बनवला
बिहारच्या सिवान जिल्ह्यातील विनोद या ५० वर्षीय शेतकऱ्याने घरातील फेकून दिलेल्या गोष्टीपासून ३५० एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर आणि घरात पडलेल्या निरुपयोगी पंपिंग सेटचे इंजिन बनवले. या ट्रॅक्टरचे गीअर्स, फ्लायव्हीलपासून ते बॉक्सपर्यंत, लोखंडाचे बनलेले आहेत. विनोद यांनी स्वतः वेल्डिंग करून ट्रॅक्टरची फ्रेम तयार केली आणि पंपिंग सेट मशीनचे इंजिन जोडून ट्रॅक्टरचा आकार दिला. हा ट्रॅक्टर 1 लिटर डिझेल 10 गुंठे शेत नांगरून टाकू शकतो असा दावा शेतकऱ्याने केला आहे. सामान्य ट्रॅक्टर प्रमाणे हा ट्रॅक्टर सर्व कामे करू शकतो असे शेतकऱ्याने सांगितले.
शेतकऱ्याच्या या जुगाडाचे सर्वांनी केले कौतुक
बिहारमधील एका छोट्याशा गावातील 50 वर्षीय शेतकरी विनोदच्या या जुगाडचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. सर्वांनी विनोदच्या देशी जुगाड तंत्राचे कौतुक केले आहे.
Pomegranate Price । एका दिवसातच शेतकरी मालामाल! डाळिंबाला मिळाला ८०० रुपये किलोचा दर