Crop insurance । सोलापूर : शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, पूर यांसारख्या संकटांचा सामना करावा लागतो. परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या नुकसानीपासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्र सरकारने एक रुपयात पंतप्रधान पीक विमा योजना कृषी विभागामार्फत राबवली होती. एक कोटी ७० लाख ६७ हजार शेतकरी या योजनेत सहभागी झाले आहेत. जर तुम्हीही यात सहभाग घेतला असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
या योजनेअंतर्गत तब्बल ४०६ कोटी रुपये राज्य सरकारने विमा कंपन्यांना वितरीत केले असून त्यामुळे पावसाअभावी पीक वाया गेलेल्या सव्वाकोटी शेतकऱ्यांना विमा संरक्षित रकमेतील २५ टक्के रक्कम मिळणार आहे. ही नुकसान भरपाई २० ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर होणार आहेत. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
Onion Rate । कांद्याला आज सर्वात जास्तीचा किती दर मिळाला? पाहा बाजारातील स्थिती
८०० पेक्षा जास्त महसूल मंडळांना फटका
दरम्यान, राज्यातील जवळपास ८०० पेक्षा जास्त महसूल मंडळांमधील पिकांना त्याचा मोठा फटका बसला आहे. पुणे, नगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये २५ सप्टेंबरपर्यंत ४० टक्के पाऊस पडला नव्हता. त्याचवेळी ४५६ महसूल मंडळांमध्ये पावसाचा एक महिन्याचा खंड पडला होता. तर दुसरीकडे ५८८ मंडळांमध्ये तीन आठवडे पाऊसच झाला नव्हता.
प्रशासनाची कोंडी
खरीप पिकांसंदर्भात सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या विमा कंपनीने अधिसूचनेवर आक्षेप घेतला आहे. त्यामुळे प्रशासनाची कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे प्राप्त शेतकरी अर्जांची पडताळणी करण्यासंदर्भात कोणताही नियम त्या पॅटर्नमध्ये नाही, असे कृषी अधिकाऱ्यांनी संबंधित कंपन्यांना कळविले आहे.
Pomegranate Price । एका दिवसातच शेतकरी मालामाल! डाळिंबाला मिळाला ८०० रुपये किलोचा दर