Tomato Rate । मागच्या काही दिवसापूर्वी टोमॅटोला उचांकी दर मिळत होता. यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत होते. मात्र आता हाच टोमॅटो शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहेत. दोनशे रुपयांवर पोहोचलेले टोमॅटोचे दर अचानक घसरल्यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना मोठा संताप झाला आहे. टोमॅटोचे दर कोसळल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करत आहेत.
दरम्यान, टोमॅटोचे दर कोसळल्यामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर एका शेतकऱ्याने तर चक्क टोमॅटो फेकून आंदोलन केले आहे. शेटफळ येथील माढा रस्त्यालगत झालेल्या या आंदोलनाने सुमारे अर्धा तास वाहतूक खोळंबली होती.
Voter ID Card । मस्तच! आता मोबाईलच्या मदतीने तयार करता येणार मतदान कार्ड
याबाबत अधिकची माहिती अशी की, शेटफळ या ठिकाणच्या हनुमंत जाधव या शेतकऱ्याचा जवळपास पाच टन टोमॅटो व्यापाऱ्यांनी 40 पैसे प्रति किलो दराने मागितला. आपण जर टोमॅटोच्या खर्चाबाबत पाहिले तर टोमॅटो तोडणी, वाहतूक व हमालीचा खर्च जवळपास प्रति किलो दीड रुपये होतो मात्र व्यापाऱ्यांनी 40 पैशांनी टोमॅटो मागितल्याने या शेतकऱ्याला संताप अनावर झाला आणि त्यांने रस्त्यावर टोमॅटो फेकून रास्ता रोखत आंदोलन केले.
Sheep Farming । आजच सुरु करा कमी खर्चात मेंढीपालनाचा व्यवसाय, या प्रजातींचे करा संगोपन
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला अनेक शेतकऱ्यांनी पाठिंबा देत टोमॅटोच्या दराबाबत रोष व्यक्त केला. या शेतकऱ्याचे दोन एकर टोमॅटोचे क्षेत्र असून यासाठी याला अडीच लाख रुपये खर्च आला आहे. मात्र आत्तापर्यंत या शेतकऱ्याला फक्त 70 हजार रुपयांचे उत्पादन मिळाले आहे. यामधून नफा राहीची तर लांबच गोष्ट मात्र उत्पादन खर्च देखील निघणे मुश्किल झाले आहे त्यामुळे शासनाने टोमॅटोला योग्य तो दर द्यावा अशी शेतकऱ्याने मागणी केली आहे.
LPG Cylinder Price । मोठी बातमी! गॅस सिलेंडरच्या किमतींत तब्बल 209 रुपयांची वाढ