Drought Condition । यंदा शेतकऱ्यांना निसर्गाने खूप मोठा धक्का दिला आहे. ऐन पावसाळ्यातच अनेक भागात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे राज्यात दुष्काळ (Drought) परिस्थिती निर्माण झाली आहे. पाऊस वेळेत न पडल्याने अनेक पिके जळून गेली आहेत. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. चाऱ्याची मागणी जास्त असल्याने चाऱ्याच्या किमती महाग झाल्या आहेत. (Drought Condition In Maharashtra)
अजितदादांनी दिले आश्वासन
एकंदरीत निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरीवर्ग हैराण झाला आहे. शेतकरी सरकारकडे मदतीची विनंती करत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी दुष्काळी परिस्थितीबाबत मोठे विधान केले आहे. “१२८ गावे आणि २९ वाड्यांवर टँकरने पाणी सुरू असून चारा उत्पादन व्हावे यासाठी आधीच बियाणे दिले आहे. तूर्त नाही पण लोकांच्या मागणीनुसार चारा डेपोचा निर्णय घेऊ. दुष्काळाला सामोरे जाताना कुठलीही कमतरता भासू दिली जाणार नाही, असे आश्वासन अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहे.
Jowar Rate । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ज्वारीची आवक वाढताच दरात झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर
नुकताच अजित पवार यांनी जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आणि योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री संदीपान भुमरे, मंत्री अतुल सावे, आमदार सतीश चव्हाण यांच्यासह विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त जी. श्रीकांत, व इतर अधिकारी उपस्थित होते.
आगामी चार महिने महत्त्वाचे
बोलताना अजित पवार म्हणाले की, “धरणांमधील पाण्याची पातळी घटत चालली आहे. आगामी चार महिने राज्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. या काळात निवडणुकांच्या रणधुमाळीत दुष्काळ निवारणार्थ योजनांकडे दुर्लक्ष होता कामा नये, त्याबाबत प्रशासनाला सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सात तालुक्यांतील आणखी ५० महसूल मंडळ दुष्काळसदृश कक्षेत आली आहेत.”
“सोयाबीन, कपाशी दरात सुधारणा होण्यासाठी जास्त केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येईल. जिल्हा वार्षिक योजनेतून ५६० कोटीचा निधी असून यामध्ये वाढ करण्याची मागणी आहे. दिलेल्या निधीपैकी ७० टक्के खर्च झाला असून मागणीनुसार शंभर टक्के समाधान होईल, असा निधी वाढवून देऊ” असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.
PM Kisan Yojana । शेतकऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट! खात्यात येणार करोडो रुपये, कसं ते जाणून घ्या