Jowar Rate

Jowar Rate । शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ज्वारीची आवक वाढताच दरात झाली मोठी घसरण, जाणून घ्या नवीन दर

बाजारभाव

Jowar Rate । शेतकऱ्यांना दरवर्षी कोणता ना कोणता आर्थिक फटका बसतो. महत्वाचे म्हणजे ऊस, ज्वारी, बाजरी, गहू आणि मका या पिकांचे उत्पादन घेण्यात येते. दरवर्षी या पिकांचे दर बदलत असतात. एखादया वर्षी दर कमी मिळतात तर एखादया वर्षी दर जास्त मिळतात. यंदा ज्वारी (Jowar) उत्पादकांना चांगले दिवस आले होते. पण आता दरात बदल झाला आहे. (Jowar price)

Sugarcane Farmers । ऊस नको रे बाबा..! जळालेल्या उसाचं चिपाड झालं आता तरी त्याची तोडणी करा, शेतकऱ्यांची भावनिक साद

ज्वारीच्या दरात झाली घसरण

अहमदनगर येथील बाजार समितीत २१०० ते ४३०० रुपये आणि सरासरी ३२०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. सध्या हे दर दिवसाला ८०० क्विंटलपर्यंत आवक होत आहे. (Jowar price today) तसेच अहमदनगर जिल्ह्यासह सोलापूर, बीड, जालना आणि इतर भागांत यंदा पुरेशा प्रमाणात पाऊस पडला नाही. पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी ज्वारीची लागवड (Cultivation of sorghum) केली.

Goat Farming Business । आता बिनधास्त करा शेळीपालन, ‘ही’ बँक देतेय 50 लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कारण ज्वारी या पिकाला कमी प्रमाणात पाणी लागते. याच कारणामुळे मागील काही वर्षांपासून सातत्याने घट होत असणाऱ्या ज्वारीच्या क्षेत्रात राज्यात चार लाख हेक्टरने वाढ झाल्याचे यंदा पाहायला मिळाले आहे. दरम्यान, गेल्या महिनाभरापूर्वी सात हजार रुपये क्विंटलपर्यंत ज्वारीचे दर गेले होते. पण आता ज्वारीच्या दरात मोठी घट झाली आहे.

PM Kisan Yojana । शेतकऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट! खात्यात येणार करोडो रुपये, कसं ते जाणून घ्या

कारण बाजारात आवक होताच दरात घट झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड, सोलापूर भागातून नगरला ज्वारीची आवक होत आहे. सात हजार रुपये क्विंटलपर्यंत गेलेलं दर आता आवक वाढताच कमी झाले आहेत. किरकोळ आणि ठोक दरात दुपटीने फरक आहे. याचा परिणाम शेतकऱ्यांना सहन करावा लागणार आहे.

Havaman Andaj । हवामान खात्याचा शेतकऱ्यांना इशारा! विजांच्या गडगडाटांसह ‘या’ भागात अवकाळी पाऊस लावणार दमदार हजेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *