Onion price

Onion price । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याच्या किमतीत कमालीची वाढ

बाजारभाव

Onion price । कांद्याला मागणी जास्त असल्याने दरवर्षी त्याची मोठ्या प्रमाणात लागवड होते. परंतु दरवर्षी कांद्याला चांगला भाव मिळतोच असे नाही. अनेकदा कांद्याचे भाव खूप पडतात. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक संकटही येते. बाजारभाव नसल्याने शेतकऱ्यांना कांदा शेतातच सडू द्यावा लागतो. यंदाही कांद्याचे दर (Onion Rate) चांगलेच पडले आहेत. दर पडल्याने कांद्याची पुन्हा एकदा चर्चा होऊ लागली आहे.

Havaman Andaj । विजांच्या कडकडाटासह आज पुन्हा अवकाळी पावसाचे थैमान! हवामान खात्याकडून अलर्ट जारी

सध्या राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यात कांद्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कांदा उत्पादन भागात म्हणजे येवला, देवळा, सटाणा, मालेगावमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला आहे. येथेही कांद्याचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.

Duck-Fish Farming । बदकांसह मासेपालनातुन मिळवा दुप्पट नफा, कसे ते जाणून घ्या

गारपीटीने मोठे नुकसान

इतकेच नाही तर नाशिक, धुळे, नगर, पुणे अशा कांदा उत्पादन घेणाऱ्या परिसरातही पावसामुळे कांदा पिकाचे खूप नुकसान झाले आहे. शेतात काढून ठेवलेल्या आणि काढणीवर आलेल्या लाल – रांगडा कांद्याचे गारपीटीने नुकसान झाले आहे. त्यामुळे आता येत्या काळात कांद्याची टंचाई निर्माण होऊ शकते. आज कांद्याच्या दराने अचानक मोठा उच्चांक (Onion Rate Hike) गाठला आहे.

Success Story । चर्चा ती फक्त चार फूट लांब बाजरीच्या कणसाची! गावठी बियाण्याने केली कमाल

कांद्याच्या वाढल्या किमती

मागील आठवड्यापासून लासलगाव पिंपळगावसह बाजारसमित्यांमधील लाल कांद्याची आवक वाढत चालल्याचे दिसत होते, त्यामुळे किरकोळ बाजारातील कांद्याचे दर कमी होत होते. मागील आठवड्यात उन्हाळी कांद्याला सरासरी ३२०० ते ३४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत होता. लाल कांद्याला ३००० रुपयांचा दर प्रति क्विंटल मिळत होता. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडील मागील आठवड्यातील आकडेवारी नुसार बाजारसमित्यांमधील उन्हाळी कांद्याची आवक कमी होऊन लाल कांद्याची आवक वाढत चालली होती.

Maize Tur Market । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मका आणि तुरीच्या किमतीत मोठी वाढ

परंतु कालच्या पावसाने आता लाल कांद्याची आवक कमी होताना दिसणार आहे. काही शेतकऱ्यांनी दर कमी झाल्याने चाळीत कांदा साठवून ठेवला आहे, अशा शेतकऱ्यांकडील कांदा पावसाळी वातावरण आणि ओलाव्यामुळे खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकंदरीतच आवक कमी झाल्याने दोन्ही प्रकारच्या कांद्याचे दर वाढल्याचे पाहायला मिळत आहेत.

Milk Price । पशुपालक चिंतेत! दूध दरात कमालीची घसरण, खुराकाचेही वाढले दर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *