Unseasonal Rainfall

Unseasonal Rainfall । सरकारचा मोठा निर्णय! अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करणार

बातम्या

Unseasonal Rainfall । अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने (Heavy Rain) हजेरी लावल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. हातातोंडाशी आलेल्या सर्व पिकांचे पावसामुळे नुकसान झाल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे बागातदारांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Onion price । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याच्या किमतीत कमालीची वाढ

तातडीने पंचनामे होणार

अशातच आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. अवकाळी पावसामुळे राज्यातील तूर, द्राक्ष, कापूस, भात आणि कांदा पिकाचे खूप नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी धाव घेतली आहे. त्यांनी प्रशासनाला अवकाळी पावसाच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.

Duck-Fish Farming । बदकांसह मासेपालनातुन मिळवा दुप्पट नफा, कसे ते जाणून घ्या

या जिल्ह्यात अवकाळी

मागील काही दिवसांपासून अवकाळी पावसाचा फटका राज्यातील अनेक जिल्ह्यांना बसला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, अहमदनगर, परभणी, नांदेड, बुलडाणा यासह इतर जिल्ह्यांना पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. यात कापणीला आलेले भात पिके जमीनदोस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Havaman Andaj । विजांच्या कडकडाटासह आज पुन्हा अवकाळी पावसाचे थैमान! हवामान खात्याकडून अलर्ट जारी

पिकांचे मोठे नुकसान

अवकाळी पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. जळगाव जिल्ह्यादेखील वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. भडगाव, पाचोरा आणि चाळीसगाव या तालुक्याला पावसाने झोडपून काढले आहे. या पावसाचा सर्वात जास्त फटका नंदुरबारमधील मिरची खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना बसला आहे. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्याकडून खरेदी केलेली जवळपास 20 ते 25 हजार क्विंटल मिरची भिजली असल्याने ३० टक्के मिरची खराब होऊ शकते.

Success Story । चर्चा ती फक्त चार फूट लांब बाजरीच्या कणसाची! गावठी बियाण्याने केली कमाल

ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा पीक विमा काढला आहे, त्यांनी तातडीने 72 तासांच्या आत क्रॉप इन्शुरन्स (Crop Insurance) अॅप किंवा 1800118485 या टोल फ्री क्रमांकावर किंवा लेखी स्वरुपात तक्रार करावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तक्रार करावे जेणेकरून त्यांना लवकर मदत मिळेल.

Maize Tur Market । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! मका आणि तुरीच्या किमतीत मोठी वाढ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *