Fertilizers licenses

Fertilizers licenses । राज्यातील विकास सोसायट्यांना मिळणार खतविक्रीचा परवाना, सहकार खात्याचा आदेश

बातम्या

Fertilizers licenses । शेतकऱ्यांना अनेकदा जास्त पैशांची गरज पडते. अशावेळी त्यांच्याकडे पैसे असतातच असे नाही. त्यामुळे ते कर्ज घेतात. कमी कर्ज देणाऱ्या बँकेकडून शेतकरी मोठ्या प्रमाणात कर्ज (Loan) घेतात. सरकार देखील काही योजनांच्या मदतीने सवलतीत कर्ज उपलब्ध करून देते. शेतकऱ्यांना सहज कर्ज उपलब्ध व्हावे यासाठी विकास सोसायट्या जिल्हा बँकांशी संलग्न आहेत.

Unseasonal Rainfall । सरकारचा मोठा निर्णय! अवकाळी पावसाच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करणार

या विकास सोसायट्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज वाटप करणे आणि त्यांचा भरणा वेळेत करून घेऊन नव्याने कर्ज वाटप करतात. आता याच विकास सोसायट्यांचे संगणकीकरण करण्यासाठी केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील संगणकीकरण होत असणाऱ्या २० हजार ८४४ विकास सोसायट्यांना प्राधान्याने किरकोळ खत विक्रीचा परवाना दिला जाणार आहे.

Onion price । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! कांद्याच्या किमतीत कमालीची वाढ

सध्या सेक्रेटरीच्या चिठ्ठ्या-चपाट्यावर विकास सोसायट्यांचा व्यवहार सुरळीतपणे सुरु आहे. आता तो संगणकीकरणाद्वारे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला आहे. सरकारने यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. सरकारने उपलब्ध करून दिलेल्या निधीतून राज्यातील २० हजार ८४४ विकास संस्था संगणकीकरण केल्या जाणार आहे. केवळ याच संस्थांना परवाने मिळेल.

Duck-Fish Farming । बदकांसह मासेपालनातुन मिळवा दुप्पट नफा, कसे ते जाणून घ्या

७७८ सोसायट्यांना खत दुकाने

तसेच राज्यातील ७७८ विकास सोसायट्यांना खत विक्रीचे परवाने (Fertilizer sales licenses) दिले आहेत. त्या- त्या गावात खत विक्री या विकास सोसायट्या करत आहेत. सोलापूर जिल्हात २२ विकास सोसायट्यांना खत विक्रीचा परवाना दिला आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे. संगणकीकरण होणाऱ्या नव्याने २० हजार विकास संस्थांना खत विक्रीचा परवाना मिळत असून या परवानाधारक कृषी सेवा केंद्राचे प्रधानमंत्री कृषी समृद्धी केंद्रात रुपांतर होईल.

Havaman Andaj । विजांच्या कडकडाटासह आज पुन्हा अवकाळी पावसाचे थैमान! हवामान खात्याकडून अलर्ट जारी

शिवाय कृषी सेवा केंद्राचा परवाना मिळवण्यासाठी कृषी पदविका आणि कृषी विज्ञान विषयात पदवी (BSc.) प्राप्त तरुण-तरुणीला अर्ज करता येतो. तुम्ही ‘आपले सरकार’ या पोर्टलवर जाऊन अर्ज करू शकता. परंतु, समजा तुम्ही परवान्याचं दर 5 वर्षांनी नूतनीतकरण केले नाही किंवा बेकायदेशीररित्या खते, बियाणे, कीटकनाशकांची विक्री केल्यास परवाना रद्द होतो.

Success Story । चर्चा ती फक्त चार फूट लांब बाजरीच्या कणसाची! गावठी बियाण्याने केली कमाल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *