Sugarcane Farmers

Sugarcane Farmers । ऊस नको रे बाबा..! जळालेल्या उसाचं चिपाड झालं आता तरी त्याची तोडणी करा, शेतकऱ्यांची भावनिक साद

बातम्या

Sugarcane Farmers । भरघोस उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून उसाची (Sugarcane) ओळख आहे. त्यामुळे देशासह राज्यात मोठ्या प्रमाणात उसाची लागवड (Sugarcane cultivation) करण्यात येते. जर तुम्ही उसाची लागवड करत असाल तर त्यासाठी योग्य ते नियोजन करणे खूप गरजेचे आहे. तरच तुम्हाला यातून जास्त उत्पन्न मिळू शकते. यंदा मात्र ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर मोठे संकट आले आहे.

Goat Farming Business । आता बिनधास्त करा शेळीपालन, ‘ही’ बँक देतेय 50 लाखांपर्यंत कर्ज; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

ऊसतोड मजुरांची मनमानी

ऊस हंगामाच्या सुरूवातीपासून शेतकरी आणि कारखानदार यांच्यात संघर्ष सुरु आहे. शेतकऱ्यांना साखर कारखानदारांचे कर्मचारी आणि ऊस तोडणाऱ्या टोळ्या फडकरी यांच्याकडून खुशालीच्या नावाखाली लुटण्याचे प्रकार सुरु आहेत. खुशाली दिल्याशिवाय उसाला कोयता लावणारच नाही, अशी भूमिका ऊसतोड मजुरांनी घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

PM Kisan Yojana । शेतकऱ्यांना सरकारकडून मोठं गिफ्ट! खात्यात येणार करोडो रुपये, कसं ते जाणून घ्या

यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पण कारखानदार देखील याकडे दुर्लक्ष करत आहे. मुळात उसाचे उत्पादन घटले असून टोळ्यांची वसुली शेतकऱ्यांना न परवडणारी ठरत आहे. अशा वेळी टोळ्यांची मनमानी सुरू आहेत, अशा तक्रारी सुरु आहेत. दरम्यान, एक एकरातील ऊस घालविण्यासाठी पाच ते ८ हजार रुपये खर्च येत असल्याचे समोर आले आहे.

Havaman Andaj । हवामान खात्याचा शेतकऱ्यांना इशारा! विजांच्या गडगडाटांसह ‘या’ भागात अवकाळी पाऊस लावणार दमदार हजेरी

आधीच पावसामुळे उसाचे उत्पादन कमी निघत असून त्यात ऊस घालवण्यासाठीचा खर्च पाहता शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघेनासा झाला आहे. अशातच आता ट्रॅक्टरचालकाची एंट्री फीसुद्धा ४०० ते ५०० रुपये झाली आहे. शिवाय ऊस घालवण्यासाठी मोठ्या शेतकऱ्यांना टोळ्यांची सरबराईच करावी लागत आहे. एकंदरीतच शेतकऱ्यांची मोठी अडचण होताना दिसत आहे.

Gram Cultivation । शेतकऱ्यांनो, हरभऱ्यावर या औषधाचा करा वापर; होईल मोठा फायदा

शेतकऱ्यांची भावनिक साद

यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचे पाहायला मिळत आहे. ऊस नको रे बाबा, असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. साहेब जळालेल्या उसाचं चिपाड झालं आता तरी तोडा, अशी भावनिक साद ऊस उत्पादक शेतकरी घालत आहेत. त्यामुळे याकडे आतातरी कारखानदार लक्ष देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरते.

Farmers Protest । विविध मागण्यांवर शेतकरी ठाम! देशभरात काढणार कँडल मार्च, सरकारचाही पुतळा जाळणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *