Tamarind Rate । अनेक शेतकरी चिंच लागवडीतून देखील बक्कळ कमाई करत असल्याचे सध्या पाहायला मिळत आहे. लातूर जिल्ह्यातील उदगीर या ठिकाणी बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये पंधरा दिवसापासून चिंचेची आवक सुरू झाली आहे. या बाजार समितीमध्ये चिंचेला ९ हजार रुपये ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत दर मिळत असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी चिंचेला चांगला भाव मिळत आहे.
Baramati News । फ्रान्सच्या शेतकऱ्यांना बारामतीतील नैसर्गिक शेतीचे आकर्षण!
यामध्ये चिंचेचे झाड विकत घेणाऱ्या छोट्या व्यापाऱ्यांपासून ते तेलंगणा व तमिळनाडू या भागात विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यापर्यंत सर्वांना चांगला फायदा होत असल्याचे दिसत आहेत. येत्या काही दिवसात चिंचेचे दर अजून वाढण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. उदगीर तालुका आणि तेथील आसपासच्या परिसरात चिंचेची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. या ठिकाणचे शेतकरी व्यापाऱ्यांना ती झाडे विकतात. त्यानंतर व्यापारी त्या झाडाची राखण करतात आणि चिंच परिपक्व झाल्यानंतर मजुरांकडून चिंच झोडपून घेतात.
Narendr Modi । महिला दिनानिमित्त PM मोदींची दिली सर्वात मोठी भेट!
यानंतर सर्व चिंच गोळा करून घरी आणल्या जातात. त्यानंतर 15 ते 20 रुपये किलो दराने व्यापारी चिंच फोडून घेतात. त्यानंतर फोडलेली चिंच व चिंचोका वेगवेगळ्या पोत्यात भरून बाजारात विक्रीसाठी आणली जाते. माहितीनुसार, उदगीरच्या बाजारामध्ये चिंचेचा सकाळी ११ वाजता सौदा निघतो. खरेदीदार व्यापारी कमी असले तरी देखील स्पर्धा जास्त असल्याने व तेलंगणा आणि तमिळनाडू, गुजरात राज्यात मागणी जास्त असल्यामुळे चिंचेला चांगला भाव मिळत आहे.
Mobile Pashusalla App । देशातलं पहिलं पशुसल्ला ॲप, मिळतील जबरदस्त फीचर्स
मागच्या वर्षी चिंचेला ८ हजार ते १० हजारापर्यंत भाव मिळत होता. मात्र यंदाच्या वर्षी ९ हजार ते १२ हजार रुपये क्विंटल पर्यंत भाव मिळत आहे. आणि पुढील काळात चिंचेचे भाव वाढण्याची देखील शक्यता व्यक्त केली जात आहे.