Mobile Pashusalla App

Mobile Pashusalla App । देशातलं पहिलं पशुसल्ला ॲप, मिळतील जबरदस्त फीचर्स

पशुसंवर्धन
Mobile Pashusalla App

Mobile Pashusalla App । राज्यात मोठ्या प्रमाणावर पशुपालन (Animal husbandry) केले जाते. पशुपालनातून पशुपालकांना चांगला आर्थिक लाभ होतो. जर तुम्ही पशुपालनाचा व्यवसाय (Animal husbandry business) करत असाल तर तुम्ही या व्यवसायाचे नियोजन करणे गरजेचे आहे. अशातच आता पशुपालकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण देशातले पहिले मोबाईल पशुसल्ला ॲपचे लोकार्पण कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या हस्ते केले आहे.

Agriculture News । नादच खुळा! ‘या’ यंत्रामुळे पिकांना उन्हाळ्यात पाण्याची कमी भासणार नाही; जाणून घ्या यंत्राबद्दल माहिती

पशुसल्ला ॲप

दरम्यान, अतिवृष्टी, ढगफुटी, वातावरणीय बदलामुळे पावसाने दिलेली ओढ, वाढते तापमान, उष्माघात आणि पावसाचा अकल्पित लहरीपणा अशा गोष्टी सतत घडत असतात. यामुळे पशुधनास चारा आणि पाणी पुरविण्यावर खूप मोठा परिणाम होतो. तसेच पशूंच्या आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होतो. अनेकदा या आजारामुळे पशूंचा जीव धोक्यात येतो. (Pashusalla App)

Incentive Grant । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार 50 हजार रुपये, कसे ते जाणून घ्या

या संकटांवर मात मिळवण्यासाठी हे ॲप मदत करेल. या ॲपमुळे शेतकऱ्यांना जनावरांचा उष्णतेमुळे निर्माण होणारा ताण कमी करण्यासाठी गोठ्यातील तापमान घटविण्याकरिता आणि योग्य आर्द्रता राखण्याकरिता सावलीची सोय करणे, पिण्याकरिता थंड पाणी उपलब्ध करून देणे, योग्य वायु विजन राखणे, फॅन किंवा फॉगर यंत्रणा स्वयंचलित पद्धतीने सुरू करणे इत्यादी उपाय योजना करण्यासाठी वेळोवेळी सूचना देण्यात येतात.

Biofloc Fish Farming । एकच नंबर! आता मत्स्यपालनात देखील नवं तंत्रज्ञान, कमी जागेत मिळणार बक्कळ पैसे

असा करा ॲपचा वापर

गुगल प्ले स्टोअरवरून Phule Amrutkal तुम्हाला हे ॲप डाऊनलोड करावे लागणार आहे. (लिंक: https://play.google.com/store/apps/details?id=com.dairy.thi) त्यानंतर तुम्हाला नोंदणी करून आपला मोबाईल नंबर टाकावा लागणार आहे. ओटीपी मिळाल्यानंतर तुम्ही तुमचा पत्ता व लोकेशन टाकून ॲप चालू करा. तुम्हाला पाहिजे त्या गाईंच्या गोठ्याचे किंवा स्थळाचे लोकेशन घेऊन त्या ठिकाणीचे तापमान आद्रता निर्देशांक मिळतो.

Garlic Price । ऐकावं ते नवलच.. लसणाची चोरी होऊ नये म्हणून हातात बंदूका घेऊन राखली जातेय निगा

पशुपालकांना या ॲपद्वारे गाईंचा ताण ओळखून सल्ला मिळेल. हे लक्षात घ्या की या ॲपचा ओपन सोर्स हवामान माहितीच्या बरोबरीनेच तापमान आणि आर्द्रतेचे सेन्सर्स वापरून मिळणाऱ्या प्रत्यक्ष माहितीच्या माध्यमातून तापमान आर्द्रता निर्देशांकाच्या आधारे पशुपालकांना व्यक्तिगत सल्ला तसेच सूचना पुरवल्या जातात.

Onion Rates । कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासदायक बातमी; आगामी काळात भाव वाढणार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *