Pm Modi

Narendr Modi । महिला दिनानिमित्त PM मोदींची दिली सर्वात मोठी भेट!

बातम्या

Narendr Modi । महिला दिनाच्या शुभमुहूर्तावर मोदी सरकारने सर्वसामान्यांना एक मोठी खुशखबर दिली आहे. खरं तर, पंतप्रधान मोदींनी आज म्हणजेच शुक्रवार, 8 मार्च 2024 रोजी महिलांना एक मोठी भेट दिली आहे. आजपासून घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत मोठी कपात करण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून देशवासियांना ही माहिती देण्यात आली आहे.

Mobile Pashusalla App । देशातलं पहिलं पशुसल्ला ॲप, मिळतील जबरदस्त फीचर्स

एलपीजी सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त

आज महिला दिनानिमित्त पंतप्रधान मोदींनी घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 100 रुपयांपर्यंतचा दिलासा दिला आहे, म्हणजेच आजपासून लाभार्थ्यांना सुमारे 100 रुपयांनी स्वस्तात एलपीजी सिलिंडर उपलब्ध होणार आहे. सरकारच्या या घोषणेमुळे करोडो कुटुंबांना आर्थिक मदत मिळणार आहे. तसेच सरकारच्या या निर्णयाचा महिला शक्तीला विशेष फायदा होणार आहे.

Agriculture News । नादच खुळा! ‘या’ यंत्रामुळे पिकांना उन्हाळ्यात पाण्याची कमी भासणार नाही; जाणून घ्या यंत्राबद्दल माहिती

राष्ट्रीय राजधानी दिल्लीत पहिल्या 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 903 रुपये असून आजपासून दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 803 रुपये झाली आहे. याआधी कोलकातामध्ये घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ९२९ रुपये होती आणि आजपासून हा सिलिंडर ८२९ रुपयांना मिळणार आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत 802 रुपये आणि चेन्नईमध्ये घरगुती एलपीजी सिलेंडरची नवीन किंमत 818.50 रुपये झाली आहे. त्याचप्रमाणे देशातील इतर शहरांमध्येही घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल करण्यात आले आहेत.

Incentive Grant । शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! खात्यात जमा होणार 50 हजार रुपये, कसे ते जाणून घ्या

एलपीजीची किंमत कशी तपासायची?

तुम्हाला एलपीजी सिलिंडरची किंमत तपासायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला IOCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी कपात करण्याची घोषणा केली. यामुळे महागाईने पिचलेल्या जनेतला काही प्रमाणात दिलासा मिळेल.

Biofloc fish farming । एकच नंबर! आता मत्स्यपालनात देखील नवं तंत्रज्ञान, कमी जागेत मिळणार बक्कळ पैसे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *