Baramati News

Baramati News । फ्रान्सच्या शेतकऱ्यांना बारामतीतील नैसर्गिक शेतीचे आकर्षण!

बातम्या

Baramti News । काल दि. ९ मार्च रोजी फ्रान्सच्या शेतकऱ्यांनी बारामतीतील सावंतवाडी येथील मिलिंद सावंत यांच्या नैसर्गिक शेती फार्म आणि गावरान देशी बियाणे बीज बँक याला भेट दिली. यावेळी मिलिंद सावंत आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून फ्रान्स येथील शेतकऱ्यांना योग्य ते मागर्दर्शन करण्यात आले. यामध्ये फ्रान्सच्या शेतकऱ्यांना बियाणांची माहिती, जीवामृत कसे बनवावे त्याचबरोबर इतरही महत्वाची माहिती देण्यात आली.

Narendr Modi । महिला दिनानिमित्त PM मोदींची दिली सर्वात मोठी भेट!

फ्रान्स वरून Farmers Dialogue International – (FDI) या जागतिक संस्थेचे 11 शेतकरी व MRA PACHGNI या संस्थेचे 5 फॉरनर शेतकरी टीम शिवार फेरी साठी आले होते . त्यावेळी ते पद्मश्री डॉ सुभाष पाळेक कृषी (SPK) तंत्र व या नैसर्गीक शेती पद्धती मधे भारतीय देशी गाईचे महत्व या विषयी सखोल माहिती घेतली. त्याचबरोबर यावेळी बोलताना ते म्हणाले की आम्ही भविष्यात SPK शेती पद्धतीचे प्रयोग देखील करणार आहोत.

Mobile Pashusalla App । देशातलं पहिलं पशुसल्ला ॲप, मिळतील जबरदस्त फीचर्स

यावेळी फ्रान्स मधील शेतकऱ्यांना श्री प्रसाद घोंगडे यांनी SPK शेती विषयी इंग्लीश मधून संवाद साधुन संपुर्ण माहिती दिली. या भेटीचे नियोजन FDI व MRA- PACHGNI या संस्थेचे बारामती मधुन भारताचे सदस्य व ज्येष्ठ नागरिक निवास चे संस्थापक श्री अभय शहा सर यांनी केले होते. यावेळी सावंतवाडी गावातील व बारामती नॅचरल SPK शेतकरी ग्रूपचे सर्व शेतकरी देखील उपस्थित होते.

Agriculture News । नादच खुळा! ‘या’ यंत्रामुळे पिकांना उन्हाळ्यात पाण्याची कमी भासणार नाही; जाणून घ्या यंत्राबद्दल माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *